'तोऱ्यात वागलो नाही, मला मंत्रीपद द्या...', भाजप आमदाराची फडणवीसांकडे मागणी

भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीचे अनेक नेते मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. ही इच्छा आता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना: विधासभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन जोर- बैठका सुरु असतानाच तिनही घटक पक्षांमधील नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. भाजपसह शिवसेना राष्ट्रवादीचे अनेक नेते मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. ही इच्छा आता माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली आहे. 

काय म्हणालेत बबनराव लोणीकर?

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील त्यांना मी भेटून आलो आहे. या सरकारमध्ये मला मंत्री पदाची संधी द्यावी असे मी देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगितलं आहे.  मराठवाड्यातील मी पाचव्यांदा आमदार आहे, सिनियर आहे. 40 वर्ष मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. मी मंत्री म्हणून तोऱ्यात वागलो नाही. म्हणून मी 40 वर्ष निष्कलंक म्हणून वावरलो. कुठलाच आरोप माझ्यावर झाला नाही. त्यामुळे मंत्री म्हणून मला संधी मिळावी,' अशी भावना भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. एका सत्कार समारंभात ते बोलत होते.

नक्की वाचा: 'आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी विरोधकांना मदत केली', शिंदेंच्या आमदारांचा गंभीर आरोप

माझ्या मागे पाठीमागे शनी होता, शनी शिंगणापूरच्या शनीची पूजा करून मी आलो. आमचा सर्जेराव भोकरदनचा शनी होता असं समजतो. असे म्हणत बबणराव लोणीकर यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता बोचरी टिका केली. त्यांनी आमच्या भागात खूप कट कारस्थान केले. जेवढी करायची ती कारस्थाने या शकुनी मामाने केली. मात्र तुमच्या जिवावर मी आहे तिथे आहे. पण हे सगळे डोमकावळे उडाले असंही ते म्हणालेत. 

महत्वाची बातमी: मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय