जाहिरात

मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय

केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे.

मोदी सरकारचे मुंबईकरांना मोठं गिफ्ट! 300 नव्या लोकल अन् 5 मोठे निर्णय

मुंबई: मुंबईकरांसाठी एक अत्यंत आनंदाची अन् महत्वाची बातमी. केंद्रातील मोदी सरकारने मुंबईकरांसाठी मोठे गिफ्ट दिले आहे. राजधानी मुंबईमधील लोकल सेवेत आणखी 300 नव्या गाड्यांची भर पडणार आहे. त्यासोबतच वसईमध्ये मोठे  मेगा रेल्वे टर्मिनल्स उभारले जाणार आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी तीन महत्वाचे निर्णय घेत मुंबईकरांना मोठे गिफ्ट दिले आहे. या प्रकल्पांमध्ये  पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर, मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय, जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल यासह मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील.

नक्की वाचा : शिवलेल्या कोटचं काय करणार? गोगावलेंनी एका वाक्यात विषय संपवला

कोणत्या प्रकल्पांना मंजुरी?

✅ पोर्ट कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी पूर्वांचल ते मुंबईला जोडण्यासाठी नवीन कॉरिडॉर
✅मध्य रेल्वेच्या परळ, एलटीटी, कल्याण आणि पनवेलच्या टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय.
✅रेल्वेतील मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल्सची क्षमता वाढवण्याचा निर्णय
✅ जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनल आणि वसई येथे नवीन मेगा रेल्वे टर्मिनल.
✅ मुंबई लोकल ट्रेनच्या संख्येत 300 अतिरिक्त गाड्या जोडल्या जातील.

या प्रकल्पांमुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुलभ होईल आणि एमएमआर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि रहदारीलाही चालना मिळणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. 

समृद्ध आणि विकसित महाराष्ट्राच्या दिशेने रेल्वेचे तीन मोठे प्रकल्प मंजूर करून जनतेच्या आणि विकासाच्या हिताचे महत्त्वाचे निर्णय घेतल्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांचे मनःपूर्वक आभार, असं देवेंद्र फडणवीस यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

महत्वाची बातमी: क्रुरतेचा कळस! शेजाऱ्याकडून 9 महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; खळबळजनक घटना

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com