Nandurbar News: महायुतीबाबत आमचे अनुभव चांगले नाही, भाजप नेत्याची आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका

डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात धडगाव तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

जाहिरात
Read Time: 2 mins

 प्रशांत जव्हेरी, नंदुरबार

महायुतीबाबत आमचे अनुभव चांगले नसून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्यावर आमची ठाम भुमिका असल्याचे मत माजी मंत्री आणि भाजपा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केले आहे.  आमची भूमिका सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे आणि वरिष्ठांना माहित आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीमध्ये राहून महायुतीतील काही मित्र पक्ष काँग्रेससोबत हात मिळवणी करतात, हे पक्षाचे वरिष्ठांना चालणार आहे का? ते लोक आमचे कालही विरोधक होते आणि आजही विरोधक आहेत. त्यामुळे पुढील निवडणुका आम्ही कशा लढणार आमचे ठरले आहे, असे संकेत त्यांना शिवसेनेला दिले. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात महायुतीबद्दल डॉ. विजयकुमार गावितांनी आपली स्पष्ट केली आहे.

Advertisement

धडगाव तालुक्यात काँग्रेसला खिंडार 

डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वात धडगाव तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी, अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे धडगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा-  Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा)

धडगाव तालुक्यातील विविध गावांमधील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि विकासकामांच्या अभावामुळे नाराज होते. डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

Topics mentioned in this article