जाहिरात

Maharashtra Politics: कानाखाली मारीन, पगार कोण देते? महिला राज्यमंत्र्याची अधिकाऱ्याला दमदाटी, VIDEO

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics:  कानाखाली मारीन, पगार कोण देते? महिला राज्यमंत्र्याची अधिकाऱ्याला दमदाटी, VIDEO

Meghana Bordikar Viral Video: महायुती सरकारमधील नेते आणि मंत्र्यांची वादग्रस्त विधानांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीचमाणिकराव कोकाटेंकडून रम्मी खेळल्याच्या वादावरुन कृषिमंत्री पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. माणिकराव कोकाटेंचा हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती ज्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अशातच आता परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या वादग्रस्त व्हिडिओने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका कार्यक्रमामध्ये मेघना बोर्डीकर या अधिकाऱ्याला दमदाटी करत असून कानाखाली मारेन... अशी थेट धमकी दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत जोरदार टीका केली आहे. 

'माझी कपिल पाटील आणि रविंद्र चव्हाण यांच्याशी लढाई' कल्याणच्या माजी भाजपा आमदाराची क्लीप Viral

असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन. पगार कोण देते?  आत्ताच्या आता  बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी", अशा शब्दात मेघना बोर्डीकर या सरकारी अधिकाऱ्याला दमदाटी करत असल्याचे दिसत आहे. 

"सभागृहात रम्मी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे,  आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे. यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट पूर्ण केलं नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? फडणवीस साहेब काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा! अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com