जाहिरात

BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे

आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराज झालेल्या तीन विभागप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. पैशासाठी ही उमेदवारी दिल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.

BMC Election 2026: 'पैशासाठी निष्ठा विकली', ठाकरे गटात नाराजीनाट्य, 4 शाखाप्रमुखांचे राजीनामे

BMC Election 2026: राज्याच्या राजकारणात सध्या महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे. महापालिका निवडणुकीत तिकीटासाठी, उमेदवारी नाकारल्याने अभूतपूर्व असा संघर्ष आणि राडा पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटामध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला असून आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराज झालेल्या तीन विभागप्रमुखांनी राजीनामे दिले आहेत. पैशासाठी ही उमेदवारी दिल्याचा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.

ठाकरे गटात राजीनामानाट्य

समोर आलेल्या माहितीनुसार, चांदिवली विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १६१ मध्ये एमआयएममधून आलेल्या आयात उमेदवाराला उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ प्रभाग १६१, १५९ आणि १५७ च्या शाखाप्रमुखांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे.

BMC Election 2026: 'मराठी माणसा जागा हो...' ठाकरे गटात नाराजीनाट्य, आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने संताप

​चांदिवलीतील प्रभाग १६१ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या सहा टर्मपासून येथे शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येत आहे. अशा मजबूत पकड असलेल्या भागात निष्ठावंतांना डावलून दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्याला संधी दिल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. चांदिवलीमध्ये 
 प्रभाग क्रमांक 161,159,157 इथल्या उमाकांत भांगिरे,प्रशांत नलगे,बाळकृष्ण गटे, या शाखाप्रमुखांनी आपले राजीनामे दिले आहेत. 

दरम्यान, चांदिवलीमध्ये शिवसेनेची ताकद आहे. याठिकाणी गेल्या सहा टर्म शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आहे. मात्र तरीही पक्षाने निष्ठावतांना उमेदवारी नाकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ठाकरे गटाकडून  मागील निवडणुकीत निवडणूक लढवलेल्या एमआयएमचे नेते इमरान सय्यद नबी यांनी  शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर तात्काळ त्यांना एबी फॉर्मही देण्यात आल्याने स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com