जाहिरात

BMC Election 2026: अख्ख्या वॉर्डात फक्त 2 उमेदवारी अर्ज.. भाजप- ठाकरे गटात लढत; 'या' प्रभागाची होतेय चर्चा

विशेष म्हणजे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख पक्षांनी किंवा अपक्ष उमेदवारांनी येथे साधी उमेदवारीही दाखल केलेली नाही.

BMC Election 2026: अख्ख्या वॉर्डात फक्त 2 उमेदवारी अर्ज.. भाजप- ठाकरे गटात लढत; 'या' प्रभागाची होतेय चर्चा

BMC Election News 2026:  राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची तिकीट मिळवण्यासाठी धडपड सुरु असून  पक्षाकडून उमेदवारी नाकारलेल्या उमेदवारांचा आक्रोश, संताप पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी ताकद लावली असून प्रत्येक वॉर्डमध्ये पाच- सहा उमेदवार पाहायला मिळत आहेत. अशातच बोरीवलीमधील प्रभाग क्रमांक 15 सध्या वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. 

बोरीवली पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५ चर्चेत

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बोरीवली पश्चिममधील प्रभाग क्रमांक १५ हे राजकीय वर्तुळात चर्चेचे केंद्र बनले आहे. संपूर्ण मुंबईत जिथे बहू लढतींचे चित्र असताना, या प्रभागात मात्र केवळ दोनच उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने येथे 'वन-ऑन-वन' सामना रंगणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट या दोनच पक्षांनी येथे आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

BMC Election 2026 : मुंबईच्या सत्तेसाठी भाजपाची 'फिल्डिंग'; 137 उमेदवार रिंगणात, वाचा तुमचा उमेदवार कोण?

​प्रभाग १५ मध्ये भाजपकडून आर्थिक सल्लागार असलेल्या जिग्ना शाह निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून वाणिज्य पदवीधर असलेल्या जसजयश्री एडविन बांगेरा मैदानात आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या प्रमुख पक्षांनी किंवा अपक्ष उमेदवारांनी येथे साधी उमेदवारीही दाखल केलेली नाही.

ठाकरे गट भाजपमध्ये होणार थेट लढत! 

साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांची मोठी गर्दी असते, मात्र बोरीवलीतील या प्रभागाने यंदा नवा पायंडा पाडला आहे.
​साईबाबा नगर, कोरा केंद्र आणि वीर सावरकर उद्यान यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश असलेला हा प्रभाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, ठाकरे गटाने यावेळेस भाजपला कडवे आव्हान देण्याची तयारी केली आहे.

( (नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )

भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे, "हा विजय भाजपसाठी सोपा नसेल, आम्ही शेवटपर्यंत लढत देऊ," असा इशारा ठाकरे गटाच्या उमेदवार बांगेरा यांनी दिला आहे. दरम्यान, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाकडे आता संपूर्ण बोरीवलीचे लक्ष लागले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com