जाहिरात

Kolhapur Crime News: तोंडात बोळा कोंबला, शॉक दिला; सुट्टी मिळावी म्हणून मित्राला जीवे मारलं

इलेक्ट्रिक वायरने शॉक देऊन खून केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत बालनिरीक्षण गृहात रवानगी केली आहे.

Kolhapur Crime News: तोंडात बोळा कोंबला, शॉक दिला; सुट्टी मिळावी म्हणून मित्राला जीवे मारलं

विशाल पुजारी, कोल्हापूर

Kolhapur Crime News: पूर्वी शाळेला सुट्टी मिळावी म्हणून लहान मुले  विविध शक्कल लढवायचे. काहीजण आजारी आहे म्हणून दांडी मारायचे तर काहीजण लांबचे नातेवाईकाचे निधन झाल्याचे कारण सांगून शाळा बुडवायचे. पण येणारा काळ इतका भयंकर असेल असं कधीच वाटलं नव्हतं. याचं कारण म्हणजे कोल्हापुरातली एक धक्कादायक घटना. एका लहान मुलाने शैक्षणिक संस्थेतल्या आपल्याच १३ वर्षाच्या मित्राचा इलेक्ट्रिक शॉक देऊन खून केला आहे. संस्था सोडून घरी जाणं हे एकमेव कारण याच्या पाठीमाग होतं.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडलेल्या घटनेमुळे सगळ्यांना धक्का बसला. एका धार्मिक शैक्षणिक संस्थेत रात्रीच्या अंधारात एका मुलाने  मुलाचा खून केला. संस्थेतील इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन केलेला खून सध्या जिल्ह्यात चर्चेचा आहे. आळते या गावात ही घटना घडली आहे. ज्याचा खून झाला तो अल्पवयीन मुलगा आणि ज्याने खून केला तो अल्पवयीन मुलगा दोघेही परप्रांतीय आहेत. लहान वयात केलेले हे कृत्य सगळ्यांना हदरवणारं आहे.

(नक्की वाचा-  Raj Thackeray: 'शाळा कशा हिंदी शिकवतात हेच बघू..', राज ठाकरेंचा सरकारला गर्भित इशारा)

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आळते या गावात निजामिया मदरशा आहे. या धार्मिक शैक्षणिक संस्थेत जवळपास 80 मुले धार्मिक शिक्षण घेत होती. यामध्ये जवळपास 70 मुले ही परप्रांतीय होती. विशेष म्हणजे बिहार या राज्यातीलच ही सगळी परप्रांतीय मुले होती. याच 70 पैकी एक फैजान निजाम नावाच्या मुलाचा 16 जून रोजी पहाटे खून करण्यात आला. खून झाल्यानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संस्थेतून सुट्टी मिळून लवकर बिहार मधील आपल्या या गावी जायला मिळावं याचसाठी खून झाला. 

नेमकं काय घडलं?

आळते गावात धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन मुलं घर सोडून राहत आहेत. या ठिकाणी ते धार्मिक शिक्षण घेतात. या सर्व प्रकाराला कंटाळून, घरापासून लांब राहण्याला वैतागून विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं असावं अंदाज वर्तवला. फैजान नाजिमा हा याठिकाणी शिकत आहे. फैजान हा अकरा वर्षाचा आहे. त्याला ज्यानं मारलं तो तेरा वर्षाचा मुलगा आहे. १६ जून रोजी पहाटे पाच वाजता फैजान नजिम या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीच्या आधारे आणि चौकशी द्वारे तपास सुरू केला. 

(नक्की वाचा - Marathi Municipal School Closed : मराठी भाषा कशी वाचणार? गेल्या 13 वर्षात 131 मराठी शाळांना लागलं कुलूप)

यावेळी याच मदरशात शिकणारा अल्पवयीन मुलगा संस्था बंद पडून आपल्याला सुट्टी मिळावी आणि घरी जाता यावं यासाठी रविवारी रात्री मदरशात झोपलेल्या फैजान नजिम या अल्पवयीन मुलाच्या तोंडात कापडाचा गोळा घालून त्याला इलेक्ट्रिकवायरने शॉक देऊन खून केल्याचे समोर आले. दरम्यान सदर संशयिताची चौकशी केली असता अल्पवयीन मुलगा घाबरून काहीही सांगत नव्हता त्याला बोलत करण्यासाठी पोलिसांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांना व मानसोपचार तज्ञांना बोलवलं. यानंतर अल्पवयीन मुलगा त्यांच्यासोबत बोलता झाला आणि त्याने सुट्टी मिळावी आणि घरी जाता याव यासाठी खून केल्याच कबुली दिली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com