संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली याचे वर्णन आतापर्यंत सांगितलं जात होतं. ते वर्णन ऐकून मन सुन्न होत होतं. अंगावर काटा येत होता. पण त्यांची निघृणपणे हत्या केल्याचे फोटो आता समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहात नाहीत. यानंतर आज सोशल मीडियावर बीड बंदच्या हाक देण्यात आली आहे. बीड बंदचे पोस्टर्स सोशल मीडियावरुन व्हायरल होत आहे. मात्र अद्याप कोणत्याही पक्षाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Live Update : महायुतीमध्ये डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न, महत्त्वाची बैठक सुरु
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीमध्ये प्रयत्न सुरु झाले आहेत. मंत्री शंभूराज देसाई याच्या घरी महायुतीच्या नेत्यांची महत्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला उदय सामंत, चंद्रशेखर बावणकुळे, रविंद्र चव्हाण, सुनील तटकरे, संदीपान भूमरे उपस्थित आहेत. या बैठकीत विधीमंडळ समितींवरील आमदारांच्या नियुक्तीबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Live Update : टीम इंडियाचं दमदार कमबॅक, ऑस्ट्रेलियाचा आव्हानात्मक स्कोअर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल सुरु आहे. या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियाची संपूर्ण टीम 49.3 ओव्हर्समध्ये 264 वर बाद झाली. ऑस्ट्रेलियाचा 5 आऊट 205 असा भक्कम स्कोअर होता. त्यानंतर भारतीय बॉलर्लसनं कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला 264 वर रोखलं.
ऑस्ट्रेलियाकडून कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं सर्वात जास्त 73 रन्स केले. तर अॅलेक्स कॅरीनं 61 रन्सची खेळी केली.
भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 2 तर हार्दिक आणि अक्षर पटेलनं 1-1 विकेट घेतली.
Live Update : मोहम्मद शमीनं उडवली, स्मिथची दांडी! टीम इंडियाला मोठं यश
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची सेमी फायनल सुरु आहे. या मॅचमध्ये मोहम्मद शमीनं भारताला मोठं यश मिळवून दिलं आहे. शमीनं ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथला 73 रन्सवर आऊट केलं. ऑस्ट्रेलियाला बसलेला हा पाचवा धक्का आहे.
स्मिथनं विकेटकिपर अॅलेक्स कॅरीसोबत पाचव्या विकेटसाठी 54 रन्सची भागिदारी केली. स्मिथपाठोपाठ धोकादायक ग्लेन मॅक्सवेल देखील आऊट झाला आहे. मॅक्सवेलला अक्षर पटेलनं आऊट केलं
Live Update :अजित पवारांनी बोलावली पक्षाची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी पक्षाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देवगिरी बंगल्यावर संध्याकाळी ही बैठक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघटनात्मक बांधणीवर चर्चा होणार आहे.
अजित पवार यांनी बोलावली सर्व जिल्हाध्यक्षांची बैठक
अजित पवार यांनी सायंकाळ 5 वाजता सर्व जिल्हाध्यक्ष देवगिरी बंगला येथे बोलवली बैठक
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर तसेच संघटनात्मक बांधणी यावर चर्चा होणार
एनसीपी सर्व महत्वाचे नेते यावेळेस उपस्थित राहणार
देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला: हर्षवर्धन सपकाळ
संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी जी क्रूरता केली आहे, ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे फोटो पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. काल या घटनेची छायाचित्रे पाहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र आक्रोश करत आहे. पोलीस आणि सरकारकडे ही छायाचित्रे आणि व्हिडीओ असूनही सरकार धनंजय मुंडे यांना वाचवत होते. सरकारच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांनी तात्काळ राजीनाम द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
अबू आझमींविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक
छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या करणाऱ्या औरंग्याचे गोडवे अबू आझमींना गायले. अबू आझमी निषेध करायला पाहिजे. अबू आझमी जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे अबू आझमी देशद्रोही आहे. अबू आझमी यांना सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. छत्रपती संभाजी महाराजांचा छळ करून हत्या करणाऱ्या औरंग्याचे गोडवे गाणे म्हणजे आपल्या राष्ट्रपुरुषाचा आणि आपल्या देशभक्तीचा अपमान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
देश धर्म पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था!
धंनजय मुंडेंना सहआरोपी करा; छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक
शहरातील क्रांती चौकात धनंजय मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
धंनजय मुंडेंना सहआरोपी करत फाशी देण्याची मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मराठा आंदोलक आक्रमक
Santosh Deshmukh Murder Case : फक्त राजीनामा घेऊन काहीही होणार नाही : भाजप आमदार नमिता मुंदडा
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. सर्व तिथे भीतीत जगतात. फक्त राजीनामा घेऊन काहीही होणार नाही, असं भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी म्हटलं.
नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा झालेला आहे- अजित पवार
नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा झालेला आहे, अजित पवारांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर थोडक्यात प्रतिक्रिया. पत्रकारांच्या प्रश्नांवर अजित पवारांनी बोलणे टाळले.
महायुती सरकार बरखास्त झालं पाहिजे, आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया, "मुख्यमंत्र्यांकडे हे फोटो आधी आले नव्हते का? गृहमंत्री यांनी देखील राजीनामा दिला पाहिजे, सध्याचं राजकारण घाणेरडं झालं आहे. हे सरकार बरखास्त झालं पाहिजे."
धनंजय मुंडेंचा केवळ राजीनामा स्वीकारून चालणार नाही. सरकारच बरखास्त झालं पाहिजे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाही. संतोष देशमुख हत्येप्रकरणी डिसेंबरपासून हा विषय सुरु आहे. हत्येनंतर अधिवेशन झालं, महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा विषय लावून धरला होता. आम्ही पारदर्शक चौकशीसाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावी ही मागणी केली होती. भाजपचे आमदार देखील राजीनाम्याची मागणी करत होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
संतोष देशमुखांवर भयानक अत्याचार झाले होते. मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील असं आम्हाला वाटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचे हात कुणी बांधले होते, कशासाठी बांधले होते, मैत्रीच्या नात्यात बांधले होते का, की महायुती धर्मात बांधले होते, नेमके कशासाठी बांधले होते माहिती नाही. मात्र त्यांनी सांगितलं होतं आम्ही न्याय देऊ, चौकशी लवकर पूर्ण होईल. डिसेंबर गेला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिना आला हे अधिवेशन सुरु झालं. काल भयानक फोटो आले. महाराष्ट्राने अशी भयानक हत्या कधी पाहिली नाही. देशमुख कुटंबियांची अवस्था कशी असेल याचा विचार करु शकत नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे : CM देवेंद्र फडणवीस
धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून त्यांना पदमुक्त केले आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे.
Live Update : देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला, थोड्यात वेळात अधिकृत घोषणा
देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारला, थोड्यात वेळात अधिकृत घोषणा
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या- चित्रा वाघ
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची आधी कातडी सोलून काढा आणि मग फासावर द्या- चित्रा वाघ
Santosh Deshmukh Case : मुख्यमंत्री भज्या तळायला आहेत का? : रोहित पवार
रोहीत पवार : मुख्यमंत्री भज्या तळायला आहेत का? मुख्यमंत्र्यानी त्यांची ताकद दाखवायला हवी. तुमच्याकडे 2 महिन्यांपूर्वी संतोष देशमुखांचे फोटो आलेत. काल ते फोटो पाहिल्यानंतर आम्हाला झोप लागली नाही, अख्ख्या महाराष्ट्राला झोप आली नाही. तुम्ही मैत्री जपताय, सरकार जपताय, राजकारण जपयात पण माणुसकी जपणं तुम्हाला जमलं नाही.
थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारलं असतं : रोहित पवार
थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावलाच असता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, तुमची मैत्री कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे.
जल्लाद, राक्षस, हैवान या सगळ्याच्या पलिकडे ही घटना- सुरेश धस
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
"जल्लाद, राक्षस, हैवान या सगळ्याच्या पलिकडे ही घटना घडली. 16 डिसेंबरच्या माझ्या भाषणात हे सर्व मुद्दे बाहेर आले होते. आता तरी अजितदादांनी निर्णय बदलू नये आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावा."
Live Update : थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारलं असतं - रोहित पवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना माझी विनंती आहे, तुमची मैत्री कचऱ्यात टाका आणि आजच्या आज धनंजय मुंडेंचा राजीनामा सरकारने घेतलाच पाहिजे.
थोरले मुंडे साहेब असते तर धनंजय मुंडेंना चाबकाने मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावलाच असता
रोहित पवार, आमदार (राशप)
Live Update : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडे यांनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला
आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडे यांनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला
Live Update : स्वारगेट प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, स्वारगेट पोलिसांकडून तपास काढला
स्वारगेट प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग, स्वारगेट पोलिसांकडून तपास काढला
स्वारगेट प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आतापर्यंत स्वारगेट पोलिसांकडे या प्रकरणाचा तपास होता.
Live Update : आज विधानसपरिषदेतील लक्षवेधीचे मुद्दे कोणते?
आज विधानसपरिषदेतील लक्षवेधी...
लाडकी बहीण हफ्ता न मिळणे
झोमॅटोसारख्या सेवांसाठी काम करणारे डिलिव्हरी बॉय यांच्या समस्या..
सोमनाथ सुर्यवंशी हत्या
Live Update : अंजली दमानियांची आज सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद, काय गौप्यस्फोट करणार?
अंजली दमानिया आज सकाळी 9.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Live Update : महिला डॉक्टरांचे पद रिक्त असल्याने स्वारगेट पीडितीची पुरुष डॉक्टरांकडून बलात्कारीत तरूणीची तपासणी
पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या प्रकरणात पोलिसांपाठोपाठ आता पुण्यातील सरकारी रुग्णालय ससूनचे प्रशासनही असंवेदनशील झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला आरोपी दत्तात्रय गाडे व पीडित तरुणीचे परस्पर संमतीने संबंध होते असे सांगून पोलिसांनी तिचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. आता बलात्काराची केस मागे घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला जात आहे, अशी माहिती पीडितेचे वकील असीम सरोदे यांनी दिली आहे.