
अमोल गावंडे, प्रतिनिधी:
Buldhana Nagpur- Dhule Highway Accident News: बुलढाण्यामधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बुलढाण्याच्या नागपूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर इको कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. भुसावळहुन मलकापूरच्या दिशेने जात असलेल्या इकोकार ने एका मोठ्या ट्रेलरला मागून धडक दिली. यात चार जणांचा जागीच तर एकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री 12 वाजेच्या मलकापूर तालुक्यातील रणथम जवळ घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील दसरखेड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या अपघातातील इको कारचालक साजिद अजीज बागबान (वय 30, राहणार भुसावळ) आपल्या वाहनात काही प्रवाशांना घेऊन मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या सुमारास जात होते. यावेळी रणथम येथील हॉटेल एकता जवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात घडला.
Shocking CCTV: 'वायफाय' वरुन वाद, हैवान लेकाने आईचा जीव घेतला, निर्दयी कृत्याचा भयंकर VIDEO
त्यांच्या इको कारने उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. ही घटना समजताच हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना माहिती देत अपघाटस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली तसेच पोलिसांनी उपचारासाठी जखमींना मलकापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या अपघातात कार चालकासह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
मृतकांमध्ये 3 महिलां असून त्यांची ओळख पटलेली नाही. इको कारने ट्रेलरला मागून धडक दिल्यानंतर ट्रेलर चालक थांबला नाही, तो निघून गेला होता. मृतक कारचालक साजिद बागबान याने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून स्वतःचा व कार मधील इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यामुळे त्याच्याविरुद्ध दसरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world