जाहिरात

Buldhana News : डोक्यावर पुन्हा केस आले, पण डोळ्यांची वाट लागली; बुलढाण्यातील गावकऱ्यांसमोर नवं संकट

देशातील वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ बुलढाण्यात दाखल झाले. पण केसगळतीचं (Buldhana Hair Loss) निदान कोणीच करू शकलं नाही. हे कमी होतं त्यातच गावकऱ्यांना आता नवा त्रास जाणवत आहे.

Buldhana News : डोक्यावर पुन्हा केस आले, पण डोळ्यांची वाट लागली; बुलढाण्यातील गावकऱ्यांसमोर नवं संकट

अमोल गावंडे, प्रतिनिधी

Buldhana Villagers Visually Impaired : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana News) शेगावच्या अनेक गावांत गेल्या काही दिवसांपूर्वी टक्कल व्हायरसने ( Buldhana Hair Loss) धुमाकूळ घातल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.आधी डोक्याला खाज सुटणं, नंतर केस गळून सरळ हातात येणं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडणं, यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याची केंद्रीय पातळीवर दखल घेत अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदीक, होमिओपॅथी अशा विविध शाखेतील तज्ज्ञांचं पाचारण करण्यात आलं. बुलढाण्यातील गावांमध्ये पसरलेल्या साथीवर बुरशी प्रतिबंधक औषध देण्यात आली होती. या औषधांची मात्रा लागू पडली असून गावकऱ्यांची केसगळती थांबल्याची माहिती आहे. 

बुलढाण्यातील गावकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे. गावकऱ्यांना आता दृष्टिदोषाचा (Buldhana Villagers Visually Impaired) सामना करावा लागत आहे. महिना उलटून गेला तरी केसगळतीचं निदान झालेलं नाही. त्यातच आता दृष्टिदोषाचा त्रास जाणवू लागल्याने गावकऱ्याची चिंता अधिक वाढली आहे.  

Tiger Hunting : वाघांची निघृणपणे हत्या करणारा कुप्रसिध्द शिकारी अजित राजगोंडला 6 दिवसांची वन कोठडी

नक्की वाचा - Tiger Hunting : वाघांची निघृणपणे हत्या करणारा कुप्रसिध्द शिकारी अजित राजगोंडला 6 दिवसांची वन कोठडी

काय आहे प्रकरण?
बुलढाण्यातील या घटनेची चर्चा देशभर सुरू आहे. या गावातील व्हिडिओ अंगावर काटा आणणारे आहेत. सरळ सरळ हातात केस गळून पडल्याने अनेकजणांना अवघ्या काही दिवसात टक्कल आलं. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांचे केस गळू लागल्याने या गावातील लोकांची समस्या राष्ट्रीय समस्या ठरली होती. या लोकांना फंगल इन्फेक्शन नसल्याचा दावा डॉक्टरांनी केला होता. तर या समस्येदरम्यान आयसीएमआरच्या पथकाने गावात येऊन तपासणीही केली होती. मात्र ठोस काही कारण समोर आलं नाही.

Mumbai Bike Taxi : अवघ्या 2 महिन्यांची प्रतीक्षा, मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार, काय असतील दर?

नक्की वाचा - ​​​​​​​Mumbai Bike Taxi : अवघ्या 2 महिन्यांची प्रतीक्षा, मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होणार, काय असतील दर?

दरम्यान, यासंदर्भात आता नवी अपडेट समोर आली आहे. शेगाव तालुक्यातील बोंडगावातील अनेक लोकांच्या डोक्यावर आता एका औषधाने केस उगवले आहेत. परंतू आता त्यांना नवीन समस्या सुरू झाली आहे. ज्या लोकांना टक्कल पडलं होते, जे केस गळतीच्या समस्येने हैराण झाले होते, त्यांना आता डोळ्यांचा त्रास सुरू झाला आहे. तर काहींची नजर कमजोर होत असल्याचे या गावातील लोकांकडून सांगितले जात आहे. तर केस गळतीनंतर आता या समस्येवर तत्काळ निदान शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: