
मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी (Mumbai Traffic) पाहता नागरिकांसाठी नवनवे पर्याय उपलब्ध होत आहेत. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी कॅब यासह केबल कार सुरू करण्याचाही राज्य सरकारचा मानस आहे. मुंबईत येत्या काही दिवसात बाईक टॅक्सी (Mumbai Bike Taxi) सुरू करण्यात येणार आहे. विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत घोषणा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच मुंबई बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार आहे. याच महिन्यात यासंदर्भात मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात मुंबईत बाईक टॅक्सी धावताना दिसेल असं सरनाईक यावेळी म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या बाईक टॅक्सीमुळे मुंबईतील 10 ते 20 हजार रोजगार निर्माण होती. सध्या देशाच्या 22 राज्यांमध्ये बाईक टॅक्सी सुरू आहे. मुंबई बाईक टॅक्सी सुरू झाल्यामुळे प्रवाशांनी वाहतूक कोंडीतून लवकर सुटका होईल. त्याशिवाय स्वस्त दरात प्रवास करता येईल असंही सरनाईक यावेळी म्हणाले.
महिला प्रवासी/चालकांसाठी विशेष काळजी..
बाईक टॅक्सीचा चालक किंवा प्रवासी महिला असेल तर परिवहन विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी बाईक चालक आणि प्रवासीच्या मध्ये अंतर असावे यासाठी मधोमध पार्टीशन लावणं बंधनकारक असणार आहे. पावसाळ्यातही विशेष काळजी घेण्याच्या सूचना परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा - Rickshaw taxi fare hike : रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे नवे दर कधीपासून लागू होणार?
बऱ्याचदा वाहतूक कोडींमुळे इच्छित स्थळी पोहोचण्यास बराच वेळ लागतो. वाहतूक कोंडीमुळे ऑफिसमध्ये पोहोचण्यास वेळ लागतो. त्यात खासगी कॅबसेवा प्रत्येकवेळी परवडत नाही. त्यामुळे ही बाईक टॅक्सी फायदेशीर ठरू शकते. याचं भाडं प्रतिकिलोमीटर तीन रुपये ठरविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अन्य वाहतूक सेवांच्या तुलनेत हा आकडा खूप कमी असल्याचं म्हटलं जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world