सौरभ वाघमारे, सोलापूर
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होत आहे. अनेक आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महायुती सरकारने विभागवार मंत्रिपदे देत समतोल राखण्याता प्रयत्न केला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाबाबत पुन्हा एकदा हुलकावणी दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी एकाही आमदाराला मंत्रिपदासाठी अद्याप फोन आला नसल्याची माहिती समोर येत आहे.
मागील पाच वर्षात महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी देखील सोलापूरला मंत्रिपदपासून वंचित ठेवलं होतं. मात्र 2014 साली महायुती सरकारच्या काळात सोलापूर जिल्ह्याला सुभाष देशमुख यांच्या रूपाने एक कॅबिनेट तर विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने एक राज्यमंत्रिपद मिळालं होतं.
आमदार विजयकुमार देशमुख सलग 5 वेळा आमदार तर सुभाष देशमुख सलग 3 वेळा आमदार आहेत. तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रशासनावर असलेली पकड आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे या तीन आमदारांची नावे यंदा मंत्रिपदासाठी चर्चेत होती. मात्र तरीही सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे चित्र सध्या पाहायला मिळतंय
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विभागवार विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. प्रत्येक विभागाला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी महायुतीतील पक्षांनी प्रयत्न केला आहे. विभागवार मंत्रिमंडळ कसं असेल यावर एक नजर टाकूया.
विभागवार मंत्र्यांची यादी
मुंबई-ठाणे
- आशिष शेलार
- मंगलप्रभात लोढा
- प्रताप सरनाईक
- गणेश नाईक
(नक्की वाचा- शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं)
कोकण
- नितेश राणे
- उदय सामंत
- भरत गोगावले
- अदिती तटकरे
- योगेश कदम
उत्तर महाराष्ट्र
- दादा भुसे
- गुलाबराव पाटील
- नरहरी झिरवाळ
- गिरीश महाजन
- जयकुमार रावल
- संजय सावकारे
- माणिकराव कोकाटे
(नक्की वाचा- Narhari Zirwal : सरपंच, आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्री... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द)
पश्चिम महाराष्ट्र
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- माधुरी मिसाळ
- राधाकृष्ण विखे पाटील
- शंभुराजे देसाई
- प्रकाश अबिटकर
- चंद्रकांत पाटील
- दत्तमामा भरणे
- हसन मुश्रीफ
- जयकुमार गोरे
मराठवाडा
- पंकजा मुंडे
- अतुल सावे
- संजय शिरसाट
- बाबासाहेब पाटील
- मेघना बोर्डीकर
- धनंजय मुंडे
विदर्भ
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष जैस्वाल
- संजय राठोड
- अशोक उईके
- आकाश फुंडकर
- पंकज भोयर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world