Santosh Bangar News : शिवसेना आमदार संतोष बांगरांविरोधात गुन्हा दाखल; 'ते' वक्तव्य भोवलं

Hingoli News : निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

समाधान कांबळे, हिंगोली

हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा, असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं होतं.  

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांना 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले होते.  त्यानंतर आज खुलासा सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

(नक्की वाचा-  BJP First List : भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये काय? 99 उमेदवार कोण? वाचा सविस्तर)

संतोष बांगर काय म्हणाले होते?

हिंगोलीच्या कळमनुरी येथे पार पडलेल्या शिंदेच्या शिवसेना मेळाव्यात आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना बाहेरील मतदारांचा आढावा घेण्यास सांगितलं होतं. त्यांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना केल्या होत्या. मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी त्यांना यूपीआयद्वारे पैसे पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं होतं. आमदार संतोष बांगर यांनी थेट मतदारांना पैशाचे आमिष दाखवून मतदानाला आणण्याची भाषा केली होती. 

(नक्की वाचा-  BJP First List : मराठवाड्यात भाजपचे 16 उमेदवार घोषित, एक जागा मात्र वेटिंगवर)

उमेदवारी आधीच अर्ज भरण्याच्या तारखेची घोषणा

संतोष बांगर यांनी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आपला उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. आमदार संतोष बांगर हे येत्या 24 तारखेला शिवसेना पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.