प्रवाशांनो हे लक्षात ठेवा! मध्य रेल्वेवर 3 दिवसांचा मेगाब्लॉक, लोकलच्या 930 फेऱ्या रद्द

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. ब्लॉकदरम्यान रेल्वेचे कसे असणार आहे वेळापत्रक? जाणून घ्या माहिती

जाहिरात
Read Time: 3 mins

Central Railway Mega Block: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी सध्या ब्लॉकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटी मार्गावर 36 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सचे रुंदीकरण करण्यासाठी 63 तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी (30 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी (2 जून 2024) दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी (31 मे 2024) रात्रीपासून ते रविवारी ( 2 जून 2024) दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत 74 रेल्वे गाड्या रद्द होणार असून 122 रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे 33 लाख प्रवाशांचे हाल होणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

म.रे.ने कोणते काम हाती घेतले आहे?

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11वर सध्या 16 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबत असून या प्लॅटफॉर्मवर 24 डब्यांच्या रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे. हे काम पूर्ण मध्य रेल्वेकडून करण्यासाठी शुक्रवार(31 मे), शनिवार (1 जून) आणि रविवारी (2 जून) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. गेल्या 15 दिवसांपासून सीएसएमटी येथील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या बहुतांशी मेल/एक्स्प्रेस रद्द, तर अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. याचा फटका लोकल गाड्यांनाही बसणार आहे. ब्लॉक काळामध्ये मध्य रेल्वेवरील (Central Railway) एकूण 930 लोकल फेऱ्या रद्द होतील.  शनिवारच्या (1 जून) दिवशी सुटीकालीन वेळापत्रक चालवण्यात येईल. यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. 

(नक्की वाचा: मुंबईत आजपासून 5 टक्के पाणी कपात लागू, या धरणातील पाणीसाठा शून्य)

ब्लॉक 1 – ठाण्यामध्ये 63 तासांचा विशेष ब्लॉक

ब्लॉक कालावधी – गुरुवारी (30 मे) मध्यरात्रीच्या 12.30 वाजेपासून ते रविवारी (2 जून) दुपारपर्यंत

ब्लॉक 2 – सीएसएमटी येथे 36 तासांचा विशेष ब्लॉक

ब्लॉकची कालावधी – शुक्रवार (31 मे) मध्यरात्रीच्या 12.30 वाजेपासून ते रविवार (2 जून) दुपारी 12.30 वाजेपर्यंत

धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नाही

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, सीएसएमटी आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद, धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल.

  • शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 161 लोकल फेऱ्या रद्द
  • शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द आणि 613 लोकल अंशत: रद्द
  • रविवारी 235 लोकल फेऱ्या आणि 270 लोकल अंशत: रद्द
  • शुक्रवारी चार रेल्वेगाड्या रद्द आणि 11 रेल्वेगाड्या अंशत: रद्द
  • शनिवारी 37 रेल्वेगाड्या रद्द आणि 31 रेल्वेगाड्या अंशत: रद्द
  • रविवारी 31 रेल्वेगाड्या रद्द आणि 80 रेल्वेगाड्या अंशत: रद्द  
Advertisement

मध्य रेल्वेने घेतली ही खबरदारी

सलग तीन दिवसांचा मेगाब्लॉक पाहता प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता काही पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सांगितले की," पोलीस यंत्रणा, वाहतूक पोलीस विभागाला सीएसएमटी, भायखळा या परिसरात जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची विनंती केलीय. बेस्ट उपक्रम, एसटी महामंडळ यांना देखील जादा बस सोडण्याबाबत कळवलेय. बेस्ट उपक्रमाला सीएसएमटी, भायखळा, वडाळा भागात नियमित बस चालवण्यासह जादा 25 ते 30 बस चालवण्यात येण्याचे सांगितले आहे. एसटी महामंडळाला पुणे, नाशिक, ठाणे, पनवेल येथे जादा बस सोडण्याचे कळवण्यात आले आहे."

(नक्की वाचा : Delhi Heat Wave दिल्लीमध्ये का वाढलाय उन्हाचा तडाखा? राजस्थान -हरयाणाशी आहे कनेक्शन)

3 दिवसांचा मेगाब्लॉक, शेकडो लोकल रद्द...मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास होणार खडतर

Topics mentioned in this article