जाहिरात

'चाकरमानी' शब्द अपमानजनक, सरकार काढणार परिपत्रक

गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात..., मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल..., कोकणवासीयांसाठी चाकरमानी हे विशेषण सर्रास वापरलं जातं. मात्र आता हा शब्द वापरता येणार नाही.

'चाकरमानी' शब्द अपमानजनक, सरकार काढणार परिपत्रक

Konkan News : गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात..., मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांचे हाल..., कोकणवासीयांसाठी चाकरमानी हा शब्ज सर्रास वापरला जातो. कोकणातून मुंबई, पुणे आणि जवळच्या भागात  कामासाठी स्थायिक झालेल्या वर्गाला सर्वसाधारणपणे चाकरमानी म्हणण्याचा प्रकार रूढ झाला आहे. मात्र आता त्याला ब्रेक लागणार आहे.

यापुढे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या या वर्गाला आता चाकरमानी म्हणता येणार नाही. चाकरमानी (chakarmani name changed) हा शब्द अपमानकारक असल्याने त्याऐवजी कोकणवासीय असा शब्द वापरावा अशी मागणी करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला याबाबत निर्देश दिले आहेत. लवकरच यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात येणार आहे. 

Lalbaugcha Raja 2025: सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका; सत्य जाणून घेण्यासाठी... लालबागचा राजा मंडळाचे भाविकांना आवाहन

नक्की वाचा - Lalbaugcha Raja 2025: सतर्क राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका; सत्य जाणून घेण्यासाठी... लालबागचा राजा मंडळाचे भाविकांना आवाहन

22 ऑगस्ट रोजी मंत्रालयात एक बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. यावेळी बैटक पार पडली. या बैठकीत कोकणातील काही संघटनांनी चाकरमानी हा शब्द अपमानकारक वाटत असल्याचं सांगितलं. त्यामुळे सरकारी कागदपत्रे आणि शासकीय कामकाजात कोकणवासीय शब्द वापरावा अशी मागणी केली आहे. 

चाकरमानी शब्द कसा झाला रूढ?

गेल्या अनेक दशकांपासून कोकणातील मोठा वर्ग कामानिमित्त मुंबई, पुणे या शहरांमध्ये स्थायिक झाला. कामाच्या निमित्ताने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या भागातील नागरिक कामाच्या आणि व्यवसायासाठी मुंबई-पुण्यात स्थलांतरित झाले आहेत. कोकणातील नागरिकांसाठी चाकरमानी हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. चाकर हा शब्द सेवक आणि मानी म्हणजे मानणारा यातून चाकरमानी हा शब्द तयार झाला. काही संघटनांनी याला विरोध केला होता. हा शब्द कमीपणाचा वाटत असल्याने त्यांनी या शब्दावर आक्षेप घेतला होता. 


   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com