जाहिरात

चंद्रपुरात हळहळ! शाळेची तयारी करत असतानाच 10 वर्षाच्या मुलाला हार्टअटॅक अन् पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच 10 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जाणून घ्या संपूर्ण बातमी.

चंद्रपुरात हळहळ! शाळेची तयारी करत असतानाच 10 वर्षाच्या मुलाला हार्टअटॅक अन् पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली
"Chandrapur News: शाळेत जाण्याची तयारी करत असतानाच घडला अनर्थ"
NDTV Marathi

- अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Chandrapur News: शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ईशान सत्यपाल आत्राम (वय 10 वर्षे) असे या मुलाचे नाव होते, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील  ब्रह्मपुरी तालुक्यातील देलनवाडी येथील ही हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, ईशान हा ब्रह्मपुरी येथील लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालयात इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे तो सकाळी शाळेत जाण्यासाठी उठला. शाळेत जाण्यासाठी त्याने आंघोळ आटोपली आणि शाळेचा गणवेश परिधान केला. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते. गणवेश घालून शाळेची तयारी करत असतानाच सकाळी 7 वाजेच्या सुमारास ईशानला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला.

(नक्की वाचा: Summer Health Tips: उन्हाळ्यात सतत तोंड कोरडं पडतंय? शरीराचा हा 'वॉर्निंग सिग्नल' वेळीच ओळखा, अन्यथा...)

पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

मुलाची अशी अवस्था पाहून पालकांचा थरकाप उडाला. घरातील सदस्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात धाव घेतली. पण डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ईशानला मृत घोषित केले. अवघ्या 10 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

(नक्की वाचा: IMD Colour Code Alert Meaning: IMDकडून देण्यात येणाऱ्या Red, Orange, Yellow Alertचा अर्थ काय? जाणून घ्या)

आत्राम कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर

ईशानच्या निधनाने आत्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लहान वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देलनवाडी गाव सुन्न झाले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com