
Chhatrapati Sambhajinagar Farmers Death: मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्याच्या घटना काही थांबता थांबत नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. अशात मराठवाड्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन, परभणी आणि लातूर जिल्ह्यांतील प्रत्येकी एका घटनेचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे यंदा जानेवारी ते 11 जुलै 2025 या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे 543 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
Akola : शेतामध्ये अचानक घुसलं नाल्याचं पाणी, वृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
अशातच आता एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊलं उचलल्याने पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गंभीर बनला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तलुक्यातील पैठणच्या मर्दा गेवराईमधील भगवान शेषराव ढाकणे या शेतकऱ्याची स्वतःच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातील अंतरवाली खांडी येथील लहू भीमराव डिघुळे या शेतकऱ्याने स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन कर्जबाजारी पणाला कंटाळून आपली जीवन यात्रा संपवली.
दुसरीकडे याच दिवशी परभणीतील सेलू तालुक्यातील तिडी येथील सोपान ज्ञानोबा बोराडे या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. चौथी घटना लातूर जिल्ह्यातील असून, देवणी तालुक्यातील गुरदाळ येथील श्रीधर पंढरी घोगरे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बळीराजांचे हाल कधी संपणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Assembly Session : शेतकऱ्यांची सावकारांच्या जाचातून होणार सुटका, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world