Abdul Sattar: अब्दुल सत्तारांच्या दर्शनाने नागेश्वर मंदिर अपवित्र? तरुणांनी गोमूत्र शिंपडून केले शुद्धीकरण

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरच्या रहिमाबादमधील नागेश्वर मंदिरात मंत्री अब्दुल सत्तारांच्या दर्शनानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर 'अपवित्र' झाल्याचा दावा करत तरुणांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. यावर भाजप आणि अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Chhatrapati Sambhajinagar News: अब्दुल सत्तार यांच्या मंदिर दर्शनाचा वाद"
NDTV Marathi

- मोसीन शेख,  प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी रहिमाबाद येथील नागेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेतले. पण त्यांच्या या दर्शनानंतर काही तरुणांनी आक्षेप घेत मंदिर अपवित्र झाल्याचा दावा केला आहे. या तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडून मंदिर स्वच्छ (शुद्धीकरण) केले आहे. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. 

मांसाहाराचा मुद्दा आणि तरुणांचा विरोध

​या तरुणांनी सत्तार यांच्या मंदिरातील प्रवेशाला कडाडून विरोध केला आहे. तरुणांच्या म्हणण्यानुसार अब्दुल सत्तार सकाळी मांसाहार केल्याशिवाय घर सोडत नाहीत. अशा अपवित्र व्यक्तीने महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026) पवित्र दिवशी मंदिरात प्रवेश करणे चुकीचे आहे. याच कारणास्तव त्यांनी मंदिर अपवित्र मानून गोमूत्र शिंपडून ते पवित्र केले आहे.

(नक्की वाचा: Ajit Pawar: मोठा खुलासा! अजित पवारांचा मृत्यू, काही तासात 'त्या' 75 फाईलींवर सह्या; शाळांना वाटली खिरापत)

​भाजपाचा संतप्त सवाल: हिंदू धर्म स्वीकारला आहे का?

​या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भोसले यांनी सवाल केला की,"अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे का? जर नसेल, तर त्यांनी बाहेरूनच दर्शन घ्यायला हवे होते."

​धार्मिक नियम मोडल्याचा आरोप

​आचार्य भोसले यांनी मंदिरांच्या पवित्रतेवर भर दिला आहे. ते म्हणाले की, "आमच्या देवी-देवतांची मंदिरे ही काही स्मारकं नाहीत. मंदिरात प्रवेश करण्याचे आणि विशेषतः गर्भगृहाचे काही धार्मिक नियम असतात." राजकीय फायद्यासाठी या धार्मिक नियमांचे उल्लंघन करू नका, असे म्हणत त्यांनी सत्तारांच्या कृतीवर टीका केली आहे.

Advertisement

(नक्की वाचा: Pune News: पुणे पोलिसांचा दणका! भाजप- काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात मोठी कारवाई; राडा, दगडफेक करणं पडलं महागात)

धर्म स्वीकारा आणि मगच या'

​भाजपाने या मुद्यावरून अब्दुल सत्तारांना थेट आव्हान दिले आहे. "तुम्हाला जर देवाचे दर्शन घेण्याची खूपच इच्छा असेल, तर मग आधी हिंदू धर्म स्वीकारा आणि खुशाल आमच्या देवी-देवतांचे आशीर्वाद मिळवा," असे वक्तव्य आचार्य भोसले यांनी केले आहे, ज्यामुळे या वादात आणखी भर पडली आहे.

अंबादास दानवेंची तुषार भोसलेंवर टीका 

यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मंदिर असो मशीद असो हे सर्व सार्वजनिक ठिकाण आहे, तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का?. एखादा मुस्लीम माणूस मंदिरातून दर्शन करत असेल तर त्याचा स्वागत करावं त्याला का विरोध करावा. भारतीय जनता पार्टी धर्माला संकुचित बनवत आहे हिंदू धर्म हा व्यापक आहे, असे दानवे म्हणाले.

Advertisement

Abdul Sattar यांनी शिवमंदिरात जाऊन घेतलं दर्शन, दर्शनानंतर मंदिरात शिंपडलं गोमूत्र