
छत्रपती संभाजीनगर: कुंडात बुडून विद्यार्थ्यासह त्याला वाचवायला धावलेल्या शिक्षकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथे ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. चेतन संजय पगडे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून राजवर्धन अशोक वानखेडे असे शिक्षकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील कैलास लेणीमधील २९ नंबरवरील जोगेश्वरी लेणीसमोर असलेल्या कुंडात बुडून दोन तरुण पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली. विटखेडा येथील वेदांत अभ्यासिका क्लासेस यांची सहल वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी रविवारी सकाळी आली होती.
सहलीमध्ये पाच मुली व तीन मुले असे आठ ते नऊ जण होते. हे सर्वजण कमी पाण्यात उतरले होते. पाण्यात खेळत असताना चेतन संजय पगडे याचा पाय घसरल्याने तो कुंडात पडला. त्याला वाचण्यासाठी शिक्षक राजवर्धन अशोक वानखेडे हे कुंडात उतरले. चेतनने त्यांना मिठी मारली. यात दोघेही बुडाले. याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, ठाण्यातील उपवन या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या बालकाला अंदाज न आल्यामुळे दहा वर्षीय एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे राज चाबुकस्वार असे बालकांचे नाव आहे. त्याचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. राज समवेत इतर तीन मूल देखील फिरण्यासाठी गेले होते. पण राज हा पोहण्यासाठी उतरला होता, पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
Crime News : गुटख्यासाठी नवऱ्याने पैसे दिले नाही, बायकोने मुलांसह विष प्यायले; तिघांचा मृत्यू
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world