Chhatrapati Sambhajinagar : सध्या लग्नाचा बाजार झाल्याचं पाहायला मिळत आहे. लग्नांमध्ये प्री-वेडिंग, हॉल आणि जेवणासाठी लाखोंचा खर्च केला जातो. लग्न सोहळ्यात लाखो रुपये काहीही विचार न करता उधळले जातात. मात्र या सर्व बाजारीकरणादरम्यान नांदेडमधील एका छोट्याशा गावातील अनोख्या लग्नाने लक्ष वेधलं आहे. २० मे रोजी, कंदाहार तालुक्यातील बहादूरपुरा गावात केवळ २ व्यक्तींचं पुनर्मिलनच नाही झालं, तर संपूर्ण समाजाप्रती असलेल्या काळजीचं एक अनोखे उदाहरणही पाहायला मिळालं.
सिद्धेश्वर पेठकरने आपल्या लग्नात भेटवस्तू म्हणून गावातील प्रत्येक नागरिकाला अपघात विमा संरक्षण दिलं. सिद्धेश्वरने ३,४६५ गावकऱ्यांना १ लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षणाखाली आणले. ज्याची एकूण विमा रक्कम ३३.६ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे. याचं नेतृत्व सिद्धेश्वर आणि त्यांचे मोठे भाऊ अनूपने केली आहे.
गावातील शेतकऱ्याला मिळाली मोठी भेट...
ग्रामीण भागात राहणाऱ्या रहिवाशांनी काय संघर्षाचा सामना करावा लागू शकतो, याची पेठकर कुटुंबाला जाणीव झाली आहे. अनूपने सांगितलं की, नांदेडच्या गावात साप चावणे, वीज कोसळणे आणि अन्य दुर्घटनेमुळे अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. लग्न हा कुटुंबासाठी आनंदाचा सोहळा असतो, यानिमित्ताने दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं पेठकर कुटुंबाकडून सांगण्यात आलं.
सामूहिक विमा संरक्षण...
पेठकर कुटुंबाने स्थानिक ग्राम पंचायतीच्या नावाखाली एक सामूहिक विमा पॉलिसी घेण्याचा निर्णय घेतला. सर्व पात्र रहिवाशांसाठी गावातील मतदार यादी विमा कंपनीला देण्यात आली, ज्यामुळे हा उपक्रम पद्धतशीर आणि सर्वसमावेशक बनला. पेठकर कुटुंबाने पॉलिसीचा आर्थिक तपशील गोपनीय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पेठकर कुटुंबाच्या लग्नाला तब्बल ४५०० पाहुणे उपस्थित होते. असं पहिल्यांदाच झालं असेल जेव्हा संपूर्ण गावाला लग्नाची भेट म्हणून विमा संरक्षण देण्यात आलं. हे विमा संरक्षण एका वर्षासाठी वैध आहे आणि भविष्यात त्याच्या नूतनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नवभारत टाइम्सने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world