
रेवती हिंगवे, पुणे: पुण्यामधील आंबेगाव येथे शिवछत्रपती प्रतिष्ठान आणि दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतुन साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या चरणाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, आमदार विजय शिवतारे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"आज सकाळी शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर हजारो विद्यार्थ्यांसोबत जय शिवाजी जय भारत पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर आमच्याकरिता जी प्रेरणास्थळी निर्माण झाली आहे. स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पतनेतून साकार झालेली शिवसृष्टीच्या लोकार्पणाची संधी मिळाली आणि संध्याकाळी आग्र्याला चाललो. ज्याठिकाणी शिवाजी महाराजांना बंदिस्त करण्याचा मूर्खासारखा प्रयत्न करण्यात आला. मला असं वाटतं की आजचा दिवस माझ्याकरिता अत्यंत धन्य अशा प्रकारचा दिवस आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"मला या शिवसृष्टीचे एका शब्दात वर्णन करताना सांगितलं तर मी नि:शब्द आहे. इतकं सुंदर कार्य याठिकाणी झालेलं आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर, त्याची भव्यता जशी साकारली आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे काम याठिकाणी झाले आहे. याठिकाणी स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेचे जे दालन तयार केलेले आहे. मी जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी गेलो. थ्री डी फोरडी, 16 डीसुद्धा बघितलं. मात्र जी प्रेरणा आणि भावना या थिएटरमध्ये तयार झाली, ती अववर्णीय आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.
तसेच "देशाचा इतिहास सांगण्याकरिता कित्येक दिवस लागतील मात्र फक्त 36 मिनिटामध्ये भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामधील खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान मांडले आहे. हे त्या पद्धतीने मांडण्यात आलेले आहे, ते अक्षरशः अवर्णणीय आहे. एक हजार वर्षाचा इतिहास 36 मिनिटामध्ये मांडले आहे. सर्वांनी येऊन हे पाहिलेच पाहिजे, ज्यांनी हे बघितलं नाही, जो जिवनातल्या आनंदाला मुकला असं समजा," असंही मुख्यमंत्री म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world