जाहिरात

Naxalites News: शरणागती सुरुच! छत्तीसगडमध्ये 21 नक्षलवाद्यांचे 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १३ महिला नक्षलवादी कार्यकर्त्या (Female Naxalites) आणि ८ पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Naxalites News:  शरणागती सुरुच! छत्तीसगडमध्ये 21 नक्षलवाद्यांचे 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण

मनीष रक्षमवार, प्रतिनिधी:

छत्तीसगड: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) नक्षलवाद्यांविरुद्ध (Naxalites) सुरू असलेल्या सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईला मोठे यश मिळाले आहे. कांकेर (Kanker) जिल्ह्यामध्ये तब्बल २१ नक्षलवादी कार्यकर्त्यांनी १८ अत्याधुनिक शस्त्रांसह आत्मसमर्पण (Surrender) केले आहे. नक्षलवाद्यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये उच्च पदावरील नक्षलवाद्यांचा समावेश: आत्मसमर्पण केलेले हे सर्व कार्यकर्ते केशकल विभागाच्या (उत्तर उपक्षेत्रीय ब्युरो) कुएमारी-किस्कोडो क्षेत्र समितीचे सदस्य होते. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये विभाग समिती सचिव मुकेश यांचाही समावेश आहे.

Viral Video: धावत्या कारमधून फोडले 288 फटाके, कुख्यात गुंडाचा थेटे सेनेच्या आमदाराशी संबंध

आत्मसमर्पण केलेल्या २१ कार्यकर्त्यांमध्ये ०४ डीव्हीसीएम (विभाग उपसमिती सदस्य), ०९ एसीएम (क्षेत्र समिती सदस्य),  ०८ पक्ष सदस्य यांचा समावेश आहे.वया सर्व कार्यकर्त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात (Mainstream) सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये १३ महिला नक्षलवादी कार्यकर्त्या (Female Naxalites) आणि ८ पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

या सर्व महिला आणि पुरुषांनी सशस्त्र आणि हिंसक विचारसरणीपासून स्वतःला दूर करत शांतता (Peace) आणि प्रगतीचा (Progress) मार्ग स्वीकारला आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करताना १८ शस्त्रांचा मोठा साठाही पोलिसांच्या हवाली केला आहे. यामध्ये ३ एके-४७ (AK-47) रायफल,४ एसएलआर (SLR) रायफल, २ इन्सास (INSAS) रायफल,  ६ .३०३ रायफल, २ सिंगल-शॉट रायफल, १ बीजीएल शस्त्र (BGL Weapon) यांचा समावेश आहे.

दरम्यान,  नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी सरकारकडून चालवल्या जात असलेल्या योजना आणि सुरक्षा दलांच्या वाढत्या दबावामुळे हे कार्यकर्ते मुख्य प्रवाहात परतत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे कांकेर भागातील शांतता प्रस्थापित होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नक्की वाचा - Kalyan News: कल्याण पोलिसांनी गुन्हेगारांचा उतरवला माज! मध्यरात्री कल्याण डोंबिवलीत काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com