'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी तलाठी कार्यालये फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे आणि कसा अर्ज करू शकाल?

Advertisement
Read Time: 3 mins
वर्धा/पंढरपूर:

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मध्यप्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तौबा गर्दी झाली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालये फुल्ल झाले आहे. राज्यातील वर्धा आणि पंढरपूरच्या तलाठी कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 

आपले सरकार केंद्रावर बसायला सुद्धा जागा नाही. योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी  बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रती महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता 1 जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे. यासाठी महिलांनी तलाठी कार्यालये व आपले सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांची पंढरपुरात गर्दी झाल्याचं दिसत आहे. अपुरा कर्मचाऱ्यांमुळे महिलांची धावपळ होत आहे. पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात लाडली बहीण योजनेची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. अशातच पंढरपुरात महिलांनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी तलाठी कार्यालयात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते.

लाडली बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. यासाठीच पंढरपुरात आता महिलांची मोठी गर्दी होत आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे.

Advertisement

योजनेसाठी कोण ठरणार अपात्र ?
ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखा पक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही. या शिवाय घरता कोणी टॅक्स भरत असेल, कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल, कोणी निवृत्ती वेतन घेत असेल, कुटुंबाकडे पाच एकर पेक्षा जास्त जमिन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल. ट्रॅक्टर सोडून घरात जर चार चाकी असेल तरही ती अपात्र समजली जाईल. शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल तर ती व्यक्तीही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. 

नक्की वाचा - कोणत्या महिलांना मिळणार 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ

अर्ज कुठे आणि कसा करायचा? 
ज्या पात्र महिला आहेत त्याना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल. योजनेचे अर्ज पोर्टल,मोबाइल अॅप,सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात जावून अर्ज करता येईल. अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचे आहे. शिवाय त्याला अर्जा सोबत आधारकार्ड, रेशनकार्ड , उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि फोटो आवश्य लागणार आहेत. त्याच बरोबर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्रही द्यावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण पणे विनामुल्य असेल. शिवाय अर्ज करताना त्या महिलेने प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे. 
 

Advertisement