
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये पार पडले. साहित्यिकांच्या जुगलबंदीपेक्षा राजकीय नेत्यांच्या वादांनीच हे संमेलन प्रचंड गाजले. त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या मर्सिडीजबाबतच्या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यासंपूर्ण वादावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
"प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. विशेषतः जे साहित्यिक आहेत, या साहित्यिकांना वारंवार असं वाटतं की राजकारण्यांनी आमच्या स्टेजवर येऊ नये किंवा तसे त्यांचे नेहमी वक्तव्य असते. त्यांनीही पार्टी लाईन्सवरच्या कमेंट्स करणे योग्य नाही, त्यांनीही मर्यादा पाळायला हव्यात, असं माझं मत आहे. तसेच निलम गोऱ्हे या त्या पक्षात होत्या, त्या पक्षामध्ये काय चालतं होतं, मला माहित नाही.." असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या निलम गोऱ्हे?
दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनामध्ये असे घडलो आम्ही.. नावाचे चर्चासत्र पार पडले. या चर्चा सत्रात बोलताना निलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. निलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
दरम्यान, यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत निलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. खासदार संजय राऊत यांनीही तुम्ही किती गाड्या दिल्या? त्याच्या पावत्या पाठवा.. असे म्हणत निलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली होती. यावरुनच आता मुख्यमंत्र्यांनीही सडकून टूका केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world