विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने नुकतच राज्यातील CNG च्या किमतींमध्ये वाढ केली आहे. MGL ने याबाबत घोषणा केली आहे. त्यानुसार, CNG च्या एका किलोमागे दोन रुपयांची वाढ (CNG Price Hike) करण्यात आली आहे.
नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, नॅचरल गॅसच्या खरेदी आणि त्याच्या ऑपरेशनल प्रक्रियेत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. ज्यामुळे सीएनजीच्या किमतीत वाढ झाली आहे. यापूर्वी जुलै 2024 मध्येही महानगर गॅस लिमिटेडद्वारा राज्यात सीएनजीच्या किमतीत (CNG Rate) वाढ झाली होती.
सीएनजीच्या किमतींमध्ये झालेली वाढ मुंबईच्या जवळपासच्या परिसरातही लागू करण्यात आली आहे. यापूर्वी मुंबईत सीएनजीची किंमत 75 रुपये प्रति किलो होती. MGL द्वारे घेतलेल्या निर्णयानंतर आता सीएनजीची किंमत 77 रुपये किलोग्रॅमपर्यंत पोहोचली आहे. या निर्णयानंतर सार्वजनिक वाहतुकीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - IPL 2025 Auction : एका तासात 110 कोटी खर्च, बॉलर्सचा वरचष्मा मोडत फलंदाजांनी गाजवला दिवस
शहरातील रिक्षा, टॅक्सी, ओला-उबेरसारख्या गाड्या मोठ्या प्रमाणात सीएनजीवर अवलंबून असतात. मुंबईत सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यानंतर आता रिक्षाच्या भाडेदरात प्रतिकिलोमीटर दोन ते अडीच रुपयांची वाढ करण्याची मागणी रिक्षा युनियनने केली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं 22 नोव्हेंबरपासून सीएनजीच्या दरांत वाढ केली आहे. त्यानुसार आता प्रतिकिलो सीएनजीसाठी 75 ऐवजी 77 रुपये मोजावे लागणार आहेत. मुंबई शहरासह संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात दहा लाखांहून अधिक वाहनं सीएनजीवर चालतात. रिक्षापाठोपाठ टॅक्सी आणि इतर वाहनांच्या भाडेदरांत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world