शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते आणि कंपन्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

राज्यातील शेतकरी (Farmer News), नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप 30 जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी (25 जून) दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांसोबतच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या. सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरीपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.          

'शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा' 

मुख्यमंत्री शिंदे यावेळेस म्हणाले की, शेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे म्हणत बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ज्या भागात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रत करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

(नक्की वाचा: मेथीच्या दुप्पट किमतीत एक कोथिंबीरीची जुडी; पालेभाज्यांच्या किमतीत वाढ)

उपमुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रियस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ला निना मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालिन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

(नक्की वाचा - अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम)

कृषिमंत्र्यांनी केले हे आवाहन 

खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हाट्स अपद्वारे 9822446655 या क्रमांकावर करावी, असे आवाहन कृषीमंत्री मुंडे यांनी केले. 

Advertisement

Nandurbar | अवकाळीचा लसणाला फटका, नंदुरबार बाजारपेठेत लसूण दोनशे पार

Topics mentioned in this article