अद्यापही महाराष्ट्रात अपेक्षित पाऊस पडत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं आहे. दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांच्या किंमतीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान जुलै महिन्यात पुरेसा पाऊस न झाल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये धरणे कोरडी पडली आहे. राज्यातील अनेक भागात दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. तर काही भागात तुफान पाऊस झाल्याने शेतीचं नुकसान झालं आहे.
परिणामी पालेभाज्यांच्या विक्रीत 40 ते 50 % घट झाल्याने बाजारभाव तेजीत आहे. सध्या मुंबईसह गुजरातला जाणारी कोथिंबीर, मेथी, पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्यांच्या भावात चांगली तेजी आली आहे. पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडले आहे. नाशिकच्या बाजार समितीत कोथिंबीरीच्या एका जुडीची किंमत 120 ते 150 रूपयांपर्यंत पोहोचली आहे.
नक्की वाचा - अटल सेतूसाठी आता मनसे मैदानात; सेतूच्या सुरक्षिततेसाठी उघडली मोहीम
कोथिंबीर फार काळ टिकत नाही. त्यात पाण्यात भिजलेल्या कोथिंबीरीच्या जुड्या लवकर पिवळ्या पडतात. किंवा खराब होतात. अशावेळी पावसात कोथिंबीरीच्या आवकावर परिणामा झाला आहे आणि एका जुडीसाठी नागरिकांना 100 ते 150 रूपये मोजावे लागत आहे.
नक्की वाचा - कोथिंबीर आठवडाभर राहील फ्रेश, जाणून घ्या सोपी ट्रिक
कोथिंबीर :120 ते 150 जुडी
मेथी : 50 ते 60 रुपये जुडी
शेपू: 60 ते 70 रुपये जुडी
कांदा पात : 80 ते 90 रुपये जुडी
टोमॅटो : 40 ते 50 रुपये किलो
वांगी : 35 ते 40 रुपये किलो
ढोबळी मिरची : 50 ते 60 रुपये किलो
लवंगी मिरची: 75 ते 80 रुपये किलो
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world