जाहिरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद, नामांतर प्रकरण पेटण्याची शक्यता

सध्या राज्यात कोल्हापूर विद्यापीठ नामांतराचा मुद्दा सुरू असताना आता सिंहस्थ कुंभमेळ्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद,  नामांतर प्रकरण पेटण्याची शक्यता

Simhastha Kumbh Mela : कोल्हापूर विद्यापीठाच्या नामांतरावरुन सध्या राज्यात मोठा वाद सुरू आहे. कोल्हापुरातील विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करावं अशी मागणी हिंदुत्त्ववादी संघटनांकडून केली जात आहे. या मागणीला शिवप्रेमी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. शिवाजी विद्यापीठ नामांतराच्या विरोधात आज कोल्हापुरात आंदोलन होणार आहे. कोल्हापुरात हा वाद सुरू असताना आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यावरुन नवा वाद सुरू झाला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात नामांतराचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक-त्र्यंबकेश्वर की त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा यावरून नवा वाद सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्र्यंबकेश्वर नाशिक कुंभमेळा नामांतर करण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे नाशिकच्या साधू महंतांनी व्याकरण आणि अन्य संदर्भ देत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हेच नाव योग्य असल्याचं सांगत त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांची मागणी चुकीचं असल्याचं स्पष्ट केलं होतं.

Nagpur violence :  एका युट्यूबरच्या चुकीमुळे घडला नागपूर हिंसाचार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

नक्की वाचा - Nagpur violence : एका युट्यूबरच्या चुकीमुळे घडला नागपूर हिंसाचार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

आज त्र्यंबकेश्वरमध्ये साधुंची बैठक होणार असून नामांतराच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. कुंभमेळा त्र्यंबकेश्वरलाच भरतो, नाशिकच्या महंतांना अभ्यासाची गरज असल्याचं पंडित मयुरेश दीक्षित यांनी वक्तव्य केलं आहे