जाहिरात

सातारच्या गादीसाठी 'पारशी माणूस' इंग्रजांशी भिडला, त्यांच्याच वंशजाने Made In Satara Tractor बनवत इतिहास घडवला

Cooper Tractor : कूपर ट्रॅक्टर इंधन, ने सर्विस आणि ऑपरेशनच्या खर्चात बचत करत उत्तम परफॉरमन्स देण्याचे वचन देते. फरोख एन. कूपर हे पहिले असे कृषी पदवीधर आहेत, जे या कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांची स्वतःची शेतीही आहे.

सातारच्या गादीसाठी 'पारशी माणूस' इंग्रजांशी भिडला, त्यांच्याच वंशजाने Made In Satara Tractor बनवत इतिहास घडवला
Farrokh Cooper Chair and Managing Director of Cooper Corportation

पर्यटन, धार्मिक स्थळे आणि शेतीचा जिल्हा अशी ओळख असलेला सातारा जिल्हा आता उद्योग क्षेत्रातही भरारी घेत आहे. जागतिक पातळीवर इंजिन, इंजिनचे सुट्टे भाग आणि जनरेटर्सचे मॅन्युफॅक्चरर असलेल्या कूपर कॉर्पोरेशनने 1 फेब्रुवारी 2025 रोजी साताऱ्यात अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांटचे उद्घाटन केले आहे. कूपर टॅक्टर एनडीसी सिरीज हा कंपनीचा पहिला टॅक्टर लाँच करण्यात आला. उत्कृष्ट परफॉरमन्स, इंधन कार्यक्षमता आणि अभिनव इंजिनिअरिंगच्या माध्यमातून शेतीमध्ये क्रांती घडवण्याच्या दृष्टीने हा ट्रॅक्टर तयार करण्यात आला आहे.

उद्घाटन समारंभाला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले  मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि आमदार महेश शिंदे, रिकार्डो यूकेचे ग्लोबल प्रॉडक्ट डेव्हलपमेंट डायरेक्टर क्लाइव्ह बॅगनॉल यांसारखे मान्यवरही उपस्थित होते.

Farrokh Cooper

अत्याधुनिक ट्रॅक्टर प्लांट आणि कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीजचे लाँचिंग हे कृषी क्षेत्रासाठी नाविन्यपूर्ण आणि उच्च कार्यक्षमतेची यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याचा कूपर कॉर्पोरेशनचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. कठीण भूभाग आणि अवजड कामांसाठी तयार करण्यात आलेल्या कूपर ट्रॅक्टरमध्ये इंधन कार्यक्षमता आणि कमी देखभाल खर्च यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. जगभरातील प्रसिद्ध अभियांत्रिकी कंपन्यांच्या सहकार्याने या टॅक्टरचे डिझाईन आणि निर्मिती करण्यात आली आहे. 

डिझाईनसाठी मॅग्ना स्टेयर, इंजिन डेव्हलपमेंटसाठी रिकार्डो यूके, ट्रान्समिशनसाठी करारो इंडिया आणि हायड्रॉ लिक्ससाठी मिता इंडिया यांच्यासोबत भागीदारी करण्यात आली आहे. त्यामुळे कूपर ट्रॅक्टर इंधन, ने सर्विस आणि ऑपरेशनच्या खर्चात बचत करत उत्तम परफॉरमन्स देण्याचे वचन देते. फरोख एन. कूपर हे पहिले असे कृषी पदवीधर आहेत, जे या कारखान्याचे मालक आहेत आणि त्यांची स्वतःची शेतीही आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ट्रॅक्टरकडून नेमकी काय अपेक्षा असले, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. त्यांच्याच मार्गदर्शनातून कूपर ट्रॅक्टर विकसित करण्यात आला आहे.

Latest and Breaking News on NDTV

या नव्या उपक्रमाबद्दलचे व्हिजन स्पष्ट करताना कूपर कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक फरोख एन. कूपर म्हणाले, आज कूपर कॉर्पोरेशनसाठी ऐतिहासिक क्षण आहे, कारण आमचा पहिला ट्रॅक्टर लाँच करत आम्ही कृषी क्षेत्रात पदार्पण करत आहोत. कूपर ट्रॅक्टर एनडीसी सिरीज ही अनेक वर्षांचे संशोधन नवकल्पना आणि भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. जागतिक तंत्रज्ञान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन तयार केलेला हा ट्रॅक्टर उत्पादकता वाढवण्यासाठी, कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि कठीण शेती परिस्थितीत टिकाव धरण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. साताऱ्याशी घट्ट नाळ असलेली कंपनी म्हणून आम्ही भारतीय कृषी क्षेत्राच्या वाढीस आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीस हातभार लावत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे, असेही त्यांनी सांगितले. 

फरोख कूपर म्हणाले, कूपर कंपनीमुळे सातारचे नाव जगभरात पोहोचले आहे. मेक इन इंडियामुळे रोजगार वाढले आहेत. माझे स्वप्न होते ट्रॅक्टर तयार करायचे ते आज पूर्ण झाले आहे. साताऱ्याच्या माणसात कला भरपूर आहेत. कूपरचे इंजिन मोठ्या प्रमाणात डिफेन्सला जात आहे. जपानला इंजिन गेले असून आता ट्रॅक्टर जपानला एक्सपोर्ट करायची ऑर्डर आली आहे. माझ्या जीवनात आई आणि पत्नीने मला खूप संरक्षण दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest and Breaking News on NDTV

कूपर कुटुंबाचा वारसा

फरोख नरिमन कूपर हे सर धनजीशा बोमनजी कूपर यांचे नातू आहेत. ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ग्रामीण पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी खूप प्रयत्न केले. सर डीबी कूपर यांनी 1922 साली सातारा येथे प्रथम लोखंडी नांगराचे उत्पादन सुरू केले. 1923 ते 1932 या काळात ते सातारा नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि याच काळात त्यांनी सातारा नगरपालिका क्षेत्रात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. या काळात ते विधान परिषद आणि राज्यपालांच्या कार्यकारी परिषदेचे सदस्यही होते. त्यांनी 1934 मध्ये, पहिले डिझेल इंजिन तयार केले गेले, ज्याने ऑटोमोबाईल युगाचा पाया घातला आणि अशा प्रकारे सर डीबी कूपर हे भारतातील डिझेल इंजिन निर्मितीचे प्रणेते बनले. 

Latest and Breaking News on NDTV

राजघराण्याशी संबंध

1925 मध्ये छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर, साताऱ्याच्या गादीसाठी दत्तक घेण्यास ब्रिटिशांनी विविध कारणांमुळे विलंब केला. सर धनजीशा कूपर यांनी बऱ्याच ऐतिहासिक पुराव्यांनिशी आणि इंग्रज गव्हर्नरला पटवून दिले की शाहू महाराज हे खरेच शिवाजी महाराज घराण्याचे वंशज होते आणि तेव्हाच इंग्रजांनी वारसाहक्क बहाल केला. छत्रपती शाहू महाराजांचा विवाह ठरवण्यात सर धनजीशा कूपर यांचा मोठा वाटा होता. सातारच्या राजघराण्याची आणि कूपर कुटुंबाची 65 वर्षांची घट्ट मैत्री आजही साताऱ्याच्या स्मरणात आहे. सातारा औद्योगिक कामांच्या उद्घाटनप्रसंगी राजमाता सुमित्राराजे भोसले, छत्रपती प्रतापसिंह महाराज आणि सेठ लालचंद हे प्रमुख पाहुणे होते. चौथ्या पिढीतही उदयराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत कूपर कुटुंब आणि भोसले कुटुंबीय यांच्यातील संबंध नवीन उंचीवर पोहोचले आहेत.

Latest and Breaking News on NDTV

1947 मध्ये नरिमन कूपर आणि सर धनजीशा यांच्या मृत्यूनंतर, फारोख कूपरची आई होमाई कूपर यांच्याकडे मुंबईला जाण्याचा पर्याय होता, परंतु त्यांनी मुलांचे संगोपन करण्यासाठी आणि कुटुंबाला भूतकाळातील वैभव परत आणण्यासाठी सातारा येथे राहण्याचा विचारपूर्वक निर्णय घेतला. या काळात कूपर कुटुंब कठीण संघर्षातून जात असताना, फारोख कूपर यांनी जवळजवळ दोन दशके कुटुंबात स्थिरता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

Latest and Breaking News on NDTV

फारोख कूपर यांचे औपचारिक शिक्षण जरी कृषी क्षेत्रात झाले असले तरी, धीटपणा आणि कठोर परिश्रमातून त्यांनी अभियांत्रिकी उद्योग चालविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी अभियांत्रिकी/तांत्रिक कौशल्य प्राप्त केले. आपल्या सामाजिक बांधिलकी आणि लोकांवर विश्वास ठेवून त्यांनी संस्थेला चिरस्थायी मूल्ये निर्माण करण्यासाठी मदत केली. आणि या कार्यासाठी त्यांनी विचारपूर्वक साताऱ्यातील लोकांची निवड केली. कुपर उद्योगसमूहामुळे कूपर कार्य संस्कृती निर्माण होण्यास आणि व्यवसायातील भरघोस निकाल मिळविण्यास मदत झाली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: