VIDEO : समुद्रात मौजमजेसाठी गेले अन् भरतीच्या पाण्यात अडकले, दाम्पत्यासोबत पाहा काय घडलं?

Ratnagiri News : भाट्ये समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात सुदैवाने यश आलं आहे. भाट्ये समुद्रात मंगळवारी संध्याकाळी कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी

अनोळख्या जागी फिरायला जात असताना स्थानिक नागरिकांची मदत घेण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र अनेकदा काही अतिउत्साही पर्यटक नको ते धाडस करतात आणि फसतात. असाच काहीचा प्रकार रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी घडला आहे. समुद्रकिनारी धोकादायक ठिकाणी जाणे एका दाम्पत्याच्या चांगलंच अंगलट आलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाट्ये समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्या दाम्पत्याची मृत्यूच्या दाढेतून सुटका करण्यात सुदैवाने यश आलं आहे. भाट्ये समुद्रात मंगळवारी संध्याकाळी कोहिनूर पॉईंटच्या खालच्या बाजूला दाम्पत्य गेलं होतं. मात्र येण्यासाठी वेळ झाला आणि समुद्राला भरती आली. 

(नक्की वाचा-  "2 हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन", भाजप आमदार प्रसाद लाड यांना धमकी)

भरतीमुळे समुद्र खवळला आणि मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळू लागल्या आणि बाहेरून आलेले हे दाम्पत्य या अजस्त्र लाटांमध्ये अडकले. या जीवघेण्या प्रसंगात काय करावं हे या दाम्पत्याला कळत नव्हते. अखेर या दाम्पत्याने रत्नागिरी शहर पोलिसांकडे संपर्क साधला. मात्र अजस्त्र लाटांमध्ये या दाम्पत्याला वाचवण्यात अडचणी येत होत्या. याचवेळी येथे मासेमारी करणारे तरुण बुरहान मजगावकर आणि सुभान बुडये या दाम्पत्यासाठी देवदूत ठरले. 

(नक्की वाचा-  40 पानांची चिठ्ठी, तासाभराचा VIDEO; पत्नीच्या छळामुळे इंजिनिअरने संपवले जीवन)

जीवाची बाजी लावत या दोघा तरुणांनी अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या या दाम्पत्याला सुखरूप बाहेर काढले.अजस्त्र लाटांमध्ये अडकलेल्या दाम्पत्याची मच्छीमारांच्या मदतीने पोलिसांनी सुटका केली. सुटका होताच दाम्पत्याने दोन्ही तरुणांचे अक्षरशः पाय धरत आभार मानले. या संपूर्ण घटनेचे थरारक व्हिडिओ समोर आले आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जाताना खबरदारी घेणं आवश्यक आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article