
योगेश शिरसाट, अकोला
मूल होत नाही म्हणून नवस करण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही धक्कादायक घटना आहे. या प्रकारणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मूल होत नाही म्हणून गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण केल्याची घटना बुधवारी 14 मे रोजी उघडकीस आली होती. अवघ्या सहा तासात बार्शीटाकळी पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इन्स्टाग्रामवरची ओळख महागात पडली
फिर्यादी विवाहित महिलेची दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराळे हिच्यासोबत ओळख झाली होती. फिर्यादी महिलेला मूलबाळ होत नसल्याने, नवस करण्याच्या बहाण्याने मंदिरात घेऊन जाण्याचे आमिष दाखवण्यात आले.
(नक्की वाचा- BMC Election : नवं राजकीय समीकरण? मनसे-शिवसेना युतीबाबत हालचालींना वेग, पडद्यामागे काय घडतंय? )
दरम्यान, ज्योती हिवराळे, तिचा पती नागेश हिवराळे आणि सुपेश महादेव पाचपोर यांनी संगनमत करून 5 ते 9 मे 2025 दरम्यान फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध देऊन लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत केला. या दरम्यान, महिलेच्या फिर्यादीवरून 13 मे रोजी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय.
(नक्की वाचा- Jalgaon News : 400-425 किमी लांबून जळगावात आला, प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला अन् केली आत्महत्या)
बार्शीटाकळी ठाणेदार दीपक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ सहा तासांत आरोपींचा बुलढाणा जिल्ह्यातून शोध घेत अटक केली. सध्या तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world