जाहिरात

अमरावती हादरलं! सरपंचाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Amravati Crime news : 15 वर्षीय मुलगी बसची वाट पाहत एसटी स्टँडवर उभी होती. तिथे आरोपीने बाईकवर सोडण्याच्या बहाण्याने तिला लिफ्ट दिली.

अमरावती हादरलं! सरपंचाच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

शुभम बायस्कार, अमरावती

बदलापूरमधील शाळेत अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. त्यानंतर देखील राज्यातील महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अमरावतीत सरपंचाच्या मुलाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लिफ्ट देण्याच्या बहाण्याचे तरुणाने हे कृत्य केलं. 

15 वर्षीय मुलगी बसची वाट पाहत एसटी स्टँडवर उभी होती. तिथे आरोपीने बाईकवर सोडण्याच्या बहाण्याने तिला लिफ्ट दिली. अल्पवयीन मुलीला युवकाने मार्डीच्या जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

(नक्की वाचा - नगरसेवक ते खासदार; एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय, वसंत चव्हाणांनी कठीण काळात काँग्रेसला जिंकवलं!)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पीडित मुलगी अमरावती येथील शाळेत नवव्या वर्गात शिकते. दररोज ती एसटी बसने ये-जा करते. शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याचदरम्यान आरोपीने तिला पाहिलं. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला. तेव्हा विद्यार्थिनीने सुरुवातीला नकार दिला. 

(नक्की वाचा - बदलापूरच्या 'त्या' शाळेच्या संचालक मंडळात भाजपसह शिवसेना आणि ठाकरे गटाचेही नेते)

मात्र नंतर घरी फोन करुन कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. मात्र गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला.

याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा सरपंचाचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com