'गिरे तो भी टांग उपर, रडगाणे थांबवा...', एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावले

विरोधकांकडे आता काही मुद्दा उरला नाही,' असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: 'जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं, जेव्हा आपण जिंकतो तेव्हा बॅलेट पेपरची मागणी कोणी करायची नाही. ही खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे. विरोधकांकडे आता काही मुद्दा उरला नाही,' असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

 'यापू्र्वी झारखंडमध्येही मतदान झाले, कर्नाटकमध्येही झालं. लोकसभेतही झालं प्रियांका गांधीही जिंकल्या. मी म्हणालो होतो महाराष्ट्रातील जनता विरोधकांना चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी सर्वांनी विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. खरं म्हणजे घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत. फिल्डवर उतरुन काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात, हे या निवडणूकीने दाखवून दिले,' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

नक्की वाचा: EVM विरोधी आंदोलन पेटणार? शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधीसुद्धा मारकडवाडीला जाणार

'लोकसभेत ईव्हीएमबाबत कोणताही आक्षेप घेतला नाही. तुम्हाला विजय मिळतो तेव्हा ईव्हीएम चांगला असतो आणि जेव्हा पराभव होतो तेव्हा ईव्हीएम खराब असतो. फक्त ईव्हीएमचं नाही सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने  निकाल लागला तेव्हा ते चांगले आहेत. मात्र जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागला तेव्हा त्यांनी सुप्रीम कोर्टावरही आक्षेप घेतला. त्यामुळे विरोधी पक्षांना माझं आव्हान आहे, हे रडगाणे थांबवा, विकास गाणे सुरु करा,' असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. 

'आपल्याकडे निवडणूक आयोग आहे, घटना आहे, संविधान आहे.  हा रडीचा डाव बंद केला पाहिजे. नाना पटोले जिंकले, रोहित पवार जिंकले तिथेही ईव्हीएम घोटाळा आहे का? आता काल शपथ घेतली नाही.  मग आज शपथ घेतली म्हणजे ईव्हीएम चा आक्षेप दूर झाला का?? गेली अडीच वर्ष आम्ही फक्त आरोप पाहत आहोत. गिरे तो भी टांग उपर असं पद्धत आहे,' असा टोलाही  एकनाथ शिंदेंनी लगावला.

महत्वाची बातमी: शरद पवारांचे मारकडवाडीत जाऊन फडणवीसांना आवाहन, नेमकं काय म्हणाले?


 

Topics mentioned in this article