जाहिरात

Solapur News : 'अर्ध्या तासात येतो', बायकोला सांगून निघाला; 14 दिवसांनंतर नवऱ्याची अवस्था पाहून महिला हादरली! 

14 दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.

Solapur News : 'अर्ध्या तासात येतो', बायकोला सांगून निघाला; 14 दिवसांनंतर नवऱ्याची अवस्था पाहून महिला हादरली! 

Solapur News : सोलापुरातील विजापूर नाका परिसरात एका 30 वर्षांच्या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली. सैफुल येथील एका झाडाला गळफास घेऊन घेतलेल्या स्थितीत आढळून आला. हा तरुण 14 दिवसापासून घरातून बेपत्ता असल्याची तक्रार विजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सचिन मच्छिंद्र माने असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी खूनाचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत. 

झुडुपात गळफास घेतलेल्या अवस्थेत...

सचिन माने हा फिटनेस ट्रेनर होता. 14 मार्चपासून सचिन माने बेपत्ता होता. अर्ध्या तासात घरी येतो असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. 14 दिवसानंतर 27 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. शुक्रवारी सैफुल येथील आधार हॉस्पिटलपासून एक किलोमीटर अंतरावरील झुडुपात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. शेजारी त्याचा मोबाइल पडलेला होता.

नक्की वाचा - 'मी पप्पा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही'; आत्महत्येपूर्वी बापाची हळहळ; लेकीचा रिप्लाय वाचून अंगावर काटा येईल

आत्महत्या की खून?

बांधकामासाठी वापरात असलेल्या प्लास्टिकच्या पाइपने त्याने गळफास घेतल्याचं दिसत आहे. त्याच परिसरात त्याची दुचाकीही होती. माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली उतरवला. शासकीय रुग्णालयात हलवले. शवविच्छेदनानंतर आत्महत्या की खून याचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान खुनाच्या दिशेनेही तपास सुरू केल्याचे सांगितले. सचिन माने यांच्या मागे पत्नी कल्याणी, तीन वर्षाची मुलगी आणि एक वर्षाचा मुलगा परिवार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com