देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला 300 संत मंचावर, कोण कोण राहणार उपस्थित?

या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनाकडून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईच्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात, राज्य शासनाकडून त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू-संतांना निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यात रामकृष्ण महाराज लहवितकर, महंत भक्तिचरणदास, महंत गणेशानंद सरस्वती, महंत रमणगिरी महाराज, माधवदास राठी, ह.भ.प. संजय धोंडगे, महंत सुधीरदास पुजारी, स्वामी संविदानंद सरस्वती, कांचनताई जगताप अशा मान्यवरांचा समावेश आहे. तसंच महंत डॉ. अनिकेतशास्त्री देशपांडे यांचं नाव या यादीत विशेष उल्लेखनीय आहे. हे सर्व महंत आज पहाटेच्या सुमारास नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. 

नक्की वाचा - शपथविधीला 4 तास शिल्लक, तरीही शिंदेंचं ठरेना; महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त ड्रामा!

आजच्या शपथविधी सोहळ्याला 300 संत मंचावरती असतील अशी माहिती आहे. पंतप्रधान कार्यालयाला विनंती करून भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही व्यवस्था केली. सुरुवातीला पंतप्रधान कार्यालयाने या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवले होते. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनंतर 300 संत मंचावरती असणार आहेत. 

आज मुंबई येथे होत असलेल्या शपथविधीसाठी अहिल्यानगर येथील आदर्श गाव हिवरे बाजारचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना निमंत्रण देण्यात आला आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना शपथविधीसाठी निमंत्रित करण्यात आल आहे  पोपटराव पवार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून हिवरे बाजार गावामध्ये जलसंधारणाची कामे केली आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेण्यात आली आहे जलसंधारण आणि गावातील ग्रामपंचायतचे नियोजन या कामाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे आज होत असलेल्या शपथविधीसाठी पोपटराव पवार हे विशेष निमंत्रित आहेत.

नक्की वाचा - जातिभेद नष्ट करण्यासाठी संविधानातच व्यवस्था करायला हवी, नेमाडेंचं परखड मत

योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश 
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश 
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार 
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश 
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम 
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ 
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा 
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात 
नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाना 
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 
कॉनराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय 
भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान 
मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा 
पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संत-महंतांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती...

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज 
अण्णासाहेब मोरे (दिंडोरी) 
प्रसाद महाराज  अमळनेरकर 
चंद्रशेखर महाराज देगलूरकर 
विद्वांस बाबा महानुभाव ( फलटण) 
कारंजेकर बाबा  महानुभाव
जैन मुनी लोकेश 
नामदेव शास्त्री सानप, (भगवान गड) 
विठ्ठल महाराज (गहिनीनाथ गड)
राधानाथ स्वामी (इस्कॉन) 
राजेश साई (सिंधी समाज) 
भूषणस्वामी रामदासी (सज्जनगड)
रामगिरी महाराज