जाहिरात

कापूस, सोयाबीन उत्पादकांना गुड न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचे PM मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना वचन

या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल,' असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले. 

कापूस, सोयाबीन उत्पादकांना गुड न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचे PM मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना वचन
मुंबई:

 सोयाबीन, कापसाची हमीभावात खरेदी व्हावी. त्यांना अधिक दर मिळावा यासाठी आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील ड्युटी वाढवा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली होती.  पंतप्रधानांनी त्याबाबत निर्णय घेतला. या निर्णयाचा परिणाम दिसू लागला आहे. सोयाबीनचे दर वाढले. या हंगामात हमीभावापेक्षा अधिक दराने सोयाबीन आणि कापसाची खरेदी होईल,' असे वचन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साक्षीने शेतकऱ्यांना दिले. 
 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यानिमित्त वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर शुक्रवारी विशेष कार्यक्रम झाला, त्यामध्ये फडणवीलस बोलत होते.  यात अमरावती येथील पीएम मित्रा पार्कचे ई-भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपली वचनबद्धता स्पष्ट केली. 

फडणवीस म्हणाले, वर्ध्यातील या कार्यक्रमाच्या माध्यमातून पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभ आणि पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. या एकूणच योजनांचा विचार करता या कार्यक्रमाच्या माध्यमातून साडेसहा लाख कुटुंबांचे चित्र बदलणार आहे. त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारिता पोहचणार आहे. 

आयुष्य बदललेल्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संधी निर्माण केली आहे. राज्यात लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार रुपये महिन्याला देत आहोत. यासोबतच लखपती दीदीही तयार करीत असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

( नक्की वाचा : कांद्यानंतर सोयाबीन उत्पादकांसाठी सरकार पुढं सरसावलं, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा )
 

मायक्रो ओबीसींचे आयुष्य बदलले

इतक्या वर्षांत आमच्या लोहार, सुतार, कुंभार, सोनार, मूर्तिकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी यांचा यापूर्वीच्या सरकारने कधीही विचार केला नाही. या बारा बलुतेदारांचा, मायक्रो ओबीसींचा विचार केला नाही. या सर्वांचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. पीएम विश्वकर्मा योजनेतून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यांचा रोजगार वाढविता यावा म्हणून अर्थसहाय्य दिले. त्यांचे जीवन बदलविले, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मराठा-ओबीसी आंदोलकांमधील वाद पेटला, वडीगोद्रीत तणावाचं वातावरण
कापूस, सोयाबीन उत्पादकांना गुड न्यूज, देवेंद्र फडणवीस यांचे PM मोदींच्या साक्षीनं शेतकऱ्यांना वचन
we-have-not-paid-the-electricity-bill-for-three-generations-said-union-minster-prataprao-jadhav
Next Article
'माझ्या तीन पिढ्यांनी शेतीचं वीज बील भरलं नाही', हजार रुपये दिले की... केंद्रीय मंत्र्यांची कबुली