जाहिरात

आईच्या इच्छापूर्तीसाठी अमेरिकेतून मुलगी पायी वारीत सहभागी! 17 किमीची वारीत 300 हून अधिक भाविकांची सेवा

तब्बल 300 पेक्षा जास्त महिला आणि पुरुष भाविक भक्त खामगाव ते शेगाव हे 17 किलोमीटरचे अंतर पायी चालत श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. अशीच वारी यावर्षीही या उपासना केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.

आईच्या इच्छापूर्तीसाठी अमेरिकेतून मुलगी पायी वारीत सहभागी! 17 किमीची वारीत 300 हून अधिक भाविकांची सेवा

अमोल सराफ, बुलडाणा

विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या आणि संत नगरी म्हणून ख्याती पावलेल्या शेगाव येथे दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक श्री संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनाकरता येत असतात. मागील सलग नऊ वर्षांपासून मुंबई-ठाणे येथील श्री गजानन महाराज उपासना केंद्राच्या वतीने एक विशेष पायी वारी आयोजित केली जात आहे.

तब्बल 300 पेक्षा जास्त महिला आणि पुरुष भाविक भक्त खामगाव ते शेगाव हे 17 किलोमीटरचे अंतर पायी चालत श्रींच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात. अशीच वारी यावर्षीही या उपासना केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली.

(नक्की वाचा- Pune News: पुणे-पिंपरी चिंचवडला मिळणार 7 नवीन पोलीस स्टेशन्स, तर 3 नवे झोन मंजूर)

या वारीत दरवर्षी भाविक भक्तांची संख्या वाढत असून, उपासना केंद्राच्या ठाणे राज्यातील 50 केंद्रांमधून लक्षणीय रित्या महिलांचा यात मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

अमेरिकेतील मुलीची आईसाठी दिंडी

या वारीतील क्षमा गचके या महिला भाविक भक्ताचा सहभाग झाला आहे. गोरेगाव येथे मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या क्षमा गचके यांनी आपल्या 65 वर्षीय आईच्या पायी दिंडी चालण्याच्या इच्छापूर्ती वारीसाठी थेट अमेरिकेतून भारतात येत यात सहभाग घेतला.

(नक्की वाचा- Viral Video: भिकारी समजून मदत करायला गेला; इन्फ्लुएन्सरसोबत विचारही केला नसेल असं घडलं)

"माझी आई अनेक वर्षांपासून या दिंडीमध्ये सहभागी होत आहे आणि तिची इच्छा होती की, मी देखील एकदा यात सामील व्हावे. ही वारी पूर्ण करणे त्यांच्यासाठी केवळ धार्मिक विधी नसून, एक मोठा संकल्प आहे. मी अमेरिकेतून केवळ त्यांच्या या इच्छापूर्तीसाठी आणि श्रींच्या आशीर्वादासाठी आली आहे. ही वारी पूर्ण करणे एक अत्यंत वेगळा अनुभव आहे", असं क्षमा यांनी म्हटलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com