जाहिरात

Dharashiv Politics: 'मुख्यमंत्री तुझा तर उपमुख्यमंत्री माझा..', शिंदेंच्या शिलेदाराचा भाजप नेत्याला इशारा

भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत असून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

Dharashiv Politics: 'मुख्यमंत्री तुझा तर उपमुख्यमंत्री माझा..', शिंदेंच्या शिलेदाराचा भाजप नेत्याला इशारा

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Dharashiv Tanaji Sawant Vs Rana jagatsinh Patil News:  येत्या 48 तासांमध्ये राज्यातील पंचायत समिती तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अशातच धाराशिवमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत असून माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

तानाजी सावंत- राणा जगजितसिंह पाटील यांच्यात जुंपली...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच तानाजी सावंत यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी कारखान्यावर मेळावा घेतला. यावेळी तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांना खडे बोल सुनावत थेट आव्हान दिले. आमच्या अंगावर येण्याचे धाडस करू नका, आला अंगावर घेतला शिंगावर, असा थेट इशारा सावंत यांनी दिला.

BMC Election 2026: देवेंद्र फडणवीसांनी वरळीत गेम फिरवला, राज ठाकरेंसह आदित्य ठाकरेंना मोठा धक्का

 "सत्ता तुझी असली तर सत्ता माझीही आहे. मुख्यमंत्री तुझा असला तर उपमुख्यमंत्री माझाही आहे त्यामुळे अंगावर यायचं काम करू नका, मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, कुणाचीही डाळ शिजू देणार नाही," अशा शब्दात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी नाव न घेता आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांना सुनावल आहे. 

'आमचा नाद करु नका...'

"आमचा नाद करू नका, हार जीत आमच्यासाठी गौण आहे, आमच्या अंगावर येण्याचे धाडस करू नका, आला अंगावर घेतला शिंगावर, तू कुणीही आस मला काय देणं घेणं नाही" असं म्हणत त्यांनी भाजप आमदार राणा पाटलांना थेट इशारा देऊन टाकला आहे. तानाजी सावंत यांनी आमदार राणा पाटलांना खडे बोल सुनावल्यानंतर आता भाजप काय प्रत्युत्तर देत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नक्की वाचा - Latur News : हिंदुत्ववादी भाजपाचा लातूरमध्ये 'मुस्लीम पॅटर्न', चक्क 7 उमेदवारांना तिकीट; काय आहे कारण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com