जाहिरात

Dhule News: भाजपच्या विजयी रॅलीवर दगडफेक; शिरपुरात फुल राडा, शहरात तणावपूर्ण शांतता

Dhule News: दगडफेकीची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Dhule News: भाजपच्या विजयी रॅलीवर दगडफेक; शिरपुरात फुल राडा, शहरात तणावपूर्ण शांतता

नागिंद मोरे, धुळे

शिरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर शहरात उत्साहाचे वातावरण असतानाच एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. विजयी उमेदवारांची रॅली शहरातून जात असताना अज्ञातांनी रॅलीवर तुफान दगडफेक केली. या घटनेमुळे शिरपूर शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमकी घटना काय?

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत आपला गड राखला. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि विजयी उमेदवारांनी शहरातून विजय रॅली काढली होती. ही रॅली शिरपूर शहरातील वाल्मीक नगर भागातून जात असताना अचानक काही समाजकंटकांनी रॅलीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. ही दगडफेक कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

(नक्की वाचा-  Nashik NagarParishad Result: नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना सर्वात मोठा पक्ष! महाविकास आघाडीची कामगिरी 'झीरो')

पोलिसांची धाव आणि कारवाई

दगडफेकीची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत 2 ते 3 संशयितांना ताब्यात घेतले आहे. सध्या वाल्मीक नगर परिसरात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.

(नक्की वाचा-  Pune Election 2025: पुण्यात 'दादां'चीच हवा! अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मोठी झेप)

परिसरात तणावपूर्ण शांतता

विजयी रॅलीवर झालेल्या या हल्ल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र, पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. "कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल," असे पोलिसांनी म्हटलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com