भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर पक्षाच्या वतीने शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. पुढील सात दिवसात पाटलांनी आपली भूमिका मांडण्यात अवधीही देण्यात आला आहे.
नक्की वाचा - Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना शेवटच्या क्षणी मंत्रिपद कसं मिळालं? कोणते फॅक्टर ठरले निर्णायक?
पश्चिम महाराष्ट्रात स्वत:चा जोर वाढवण्यासाठी शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील यांचे धाकडे बंधू धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी दिली होती. माढा मतदारसंघात लोकसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील इच्छुक होते. मात्र त्यांना डावलत भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिली होती. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील नाराज होते. लोकसभा निवडणुकीत ते सायलंट राहून धाकट्या भावासाठी प्रचार करीत असल्याचाही आरोप केला जात होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपसाठी प्रचार केला नसल्याचीही माहिती आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रणजिंतसिंह मोहिते पाटील यांच्यावर काय आरोप करण्यात आले?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रचारासाठी माळशिरस येथे आले असता या कार्यक्रमात उपस्थित नव्हते.
- लोकसभा निवडणुकीत तुमच्या कुटुंबाने भाजपच्या विरोधात काम केलं.
- आपल्या कुटुंबातील सदस्यांनी भाजपच्या माढा आणि सोलापूर लोकसभेच्या जागा पाडण्यासंदर्भात जाहीर वक्तव्य
- लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शरद पवार गटाच्या उमेदवाराची गळाभेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेला भाजप विरोधी मतदानास प्रवृत्त केल्याचं निदर्शनास.
- विधानसभा निवडणुकीत आपल्या कुटुंबातील सदस्यांनी शरद पवार गटाचे मफलर गळ्यात घालून भाजपविरोधात काम केलं.
यासारखे मुद्दे समोर ठेवत भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना स्पष्टीकरण देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world