जाहिरात

Solapur News: CM फडणवीसांच्या उपस्थिती कार्यक्रम, भाजपच्या बड्या नेत्याला नो एन्ट्री, निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळलं

पक्षाने प्रकाशित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव तसेच फोटो देखील वगळण्यात आला आहे. 

Solapur News: CM फडणवीसांच्या उपस्थिती कार्यक्रम, भाजपच्या बड्या नेत्याला नो एन्ट्री, निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळलं

सौरभ वाघमारे, सोलापूर: प्रदीर्घ काळानंतर सोलापुरातील विमानसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता  विमानसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असताना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार,  सोलापूर गोवा विमानसेवेच्या निमंत्रण पत्रिकेतून सोलापूर भाजपने आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर गोवा विमान सेवेचा शुभारंभ झाला. यासाठी पक्षाने प्रकाशित केलेल्या कार्यक्रम पत्रिकेतून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव तसेच फोटो देखील वगळण्यात आला आहे. 

लोकसभा तसेच विधानसभेत बंडखोरी केल्यानंतर रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. नोटीस बजावल्यानंतरही मोहिते पाटील पक्षाच्या विविध बैठकांना हजेरी लावताना दिसले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून भाजपने मोहिते पाटलांचे नाव आणि फोटो वगळले.पक्षाचे दोन जिल्हाध्यक्ष तसेच शहराध्यक्षांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत मोहिते पाटलांचे नाव आणि फोटो वगळण्यात आले आहे. 

नक्की वाचा - Navi Mumbai News: इंग्लंडहून महागडे गिफ्ट पाठवलं, एक फोन अन् महिलेच्या खात्यातून 50 लाख फुर्रर्रर्रssss

Listen to the latest songs, only on JioSaavn.com