जाहिरात

Pune Traffic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय, विभागाकडून महत्त्वाचे बदल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्ग आणि पार्किंग व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.

Pune Traffic : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी पुण्यात वाहतूक कोंडीवर उपाय, विभागाकडून महत्त्वाचे बदल

रेवती हिंगवे, पुणे

Pune Traffic Changes : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सोमवारी 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या दिवशी आंबेडकर अनुयायी एकत्र येत रॅली काढतात. तर अनेक ठिकाणी अभिवादनपर सभेचं आयोजित केलं जातं. अशावेळी मोठ्या वाहतूक कोंडीची शक्यता असते. हे टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून मार्ग बदल करण्यात आले आहेत. याशिवाय पार्किंगमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर 


शाहिर अमर शेख चौक, आरटीओ चौक, जीपीओ चौक, पुणे स्टेशन चौक, नरपतगिरी चौक आणि बॅनर्जी चौक या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

पार्किंग
आरटीओ शेजारी एसएसपीएमएस मैदान, पुणे स्टेशन तुकाराम शिंदे पार्किंग आणि ससून कॉलनी येथे दुचाकी-चारचाकी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध आहे.

अरोरा टॉवर, कॅम्प परिसर 
डॉ. कोयाजी रोड, ईस्कॉन मंदिर चौक, नेहरु चौक, नाझ चौक येथील वाहतूक मिरवणुकीच्या वेळेत वळविण्यात येणार आहे.

पार्किंग
तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट आणि पे-अँड-पार्क ठिकाणीच आपली वाहने उभी करावीत.

Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार

नक्की वाचा - Ambedkar Jayanti 2025 Quotes : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 प्रेरणादायी विचार

विश्रांतवाडी परिसर 
विश्रांतवाडी चौक, बोपखेल, दिघी, भोसरी, आळंदी व टिंगरेनगर या दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांसाठी वेगळ्या मार्गांची आखणी करण्यात आली आहे. दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांसाठी विशिष्ट मार्ग बदल लागू असतील.

दांडेकर पुल परिसर (सिंहगड रोड) 
स्वारगेट, सिंहगड रोड, सेनादत्त चौक, आशा हॉटेल चौक, मांगीरबाबा चौक याठिकाणी वाहतूक वळविण्यात येईल.

बाजीराव रोड व गणेश रोडवरील वाहतूक  
पुरम चौक, लाल महाल चौक आणि लक्ष्मी रोडकडे जाणाऱ्या मार्गांवर आवश्यकतेनुसार वाहतूक बंद करण्यात येईल आणि पर्यायी मार्ग सुचवले जातील.

वरील सर्व बदल 14 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत लागू राहतील. विश्रांतवाडी परिसरात मात्र हे निर्बंध दुपारी 3 वाजल्यापासून लागू होणार आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद किंवा वळविण्यात येईल. वाहनचालकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे व पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.