जाहिरात

VIDEO: मुलाची अखेरची आठवण! पित्याने 6 कोटींच्या BMW कारचं जे केलं.. 'हा' व्हिडिओ पाहून हृदय पिळवटेल

पित्याने त्याच्याच कबरीजवळ तब्बल ६ कोटींची बीएमडब्लू कार पुरल्याची एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. 

VIDEO: मुलाची अखेरची आठवण! पित्याने 6 कोटींच्या BMW कारचं जे केलं.. 'हा' व्हिडिओ पाहून हृदय पिळवटेल

Father Buries Luxury Car For Son Viral Video:  मुलं म्हणजे आई- वडिलांच्या काळजाचा तुकडा अन् जगण्याचा आधार असतात. आई वडील आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावतात. कोणत्याही तरुण मुलांच्या मृत्यूचा, त्याच्या अवेळी जाण्याचा सर्वात मोठा धक्का हा त्याच्या माता-पित्यांनाच बसतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक काळीज पिळवटणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनी जे केलं ते पाहून तुमचेही डोळे पाणावतील. 

मुलगा गेला, पित्याने सहा कोटींची BMW पुरली| (Luxury Car Bought for Son)

बापासाठी आपला मुलगा किती प्रिय असतो, मुलाच्या निधनानंतर वडिलांना किती धक्का बसतो.. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पित्याने त्याच्याच कबरीजवळ तब्बल ६ कोटींची बीएमडब्लू कार पुरल्याची एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. 

Pune News: अजित पवारांच्या विमान अपघाताचा अंगावर काटा आणणार नवा Video, मोठ्या स्फोट अन् एकच धावपळ

समोर आलेल्या माहितीनुसार, वडिलांनी त्याच्या वाढदिवशी मुलाला सरप्राईज भेट म्हणून BMW कार दिली होती. मुलाला कधीही महागडी कारची इच्छा नव्हती, परंतु प्रेमापोटी वडिलांनी ₹6 कोटी किमतीची BMW खरेदी केली. मात्र गाडीची डिलिव्हरी येण्याआधीच मुलाचे आकस्मित निधन झाले, मुलगा मरण पावला तेव्हाच ही कार घरी आली होती. मुलाच्या मृत्यूने दुःखात असलेले वडील दररोज सकाळी, वडील जेव्हा BMW कार पाहत असत तेव्हा त्यांचे हृदय दुःखाने भरून यायचे. त्यांच्या मुलाच्या आठवणी त्यांना सतावत होती. 

व्हिडिओ होतोय व्हायरल |  (Viral video of BMW car burial)

शेवटी, वडिलांनी ठरवले की त्यांचा मुलगा आता जिवंत नसल्याने कारचा काही उपयोग नाही. त्यामुळेच त्यांनी JCB ने खड्डा खोदला आणि नवीन BMW मुलाच्या कबरीत उतरवण्यात आली. त्यानंतर कोणीही गाडी काढू नये म्हणून गाडीवर काँक्रीट ओतण्यात आले. वडिलांनी गाडीच्या चाव्याही खड्ड्यात फेकून दिल्या. हा व्हायरल व्हिडिओ आता लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेक जण याला वडिलांच्या अफाट प्रेमाचे उदाहरण म्हणत आहेत, तर काही जण भावनेतून उचललेले कठोर पाऊल म्हणत आहेत.

Holi Special Train: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट, 1448 विशेष ट्रेन धावणार; पाहा वेळापत्रक

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com