
आकाश सावंत, बीड
Beed Firing News : बीडच्या पवनचक्की कंपनीच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली असून या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षारक्षकाने चोरट्यांवर गोळीबार केला. बीडच्या लिंबागणेशच्या महाजनवाडी परिसरात गुरुवारी रात्री ही घटना घडली. यात एकाचा मृतदेह परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लिंबागणेश परिसरातील महाजनवाडी येथील एका खासगी पवनचक्की कंपनीच्या मालकीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी काही अज्ञात चोरटे रात्रीच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. सुरक्षारक्षकाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न करताच, त्यांना इशारा दिला.
( Vaishnavi Hagavane: 'सासऱ्याने कपडे फाडले, दिराने खाली पाडले' वैष्णवीच्या मोठ्या जावेने सर्वच सांगितलं) )
मात्र सुरक्षारक्षकाच्या इशाऱ्यानंतरही चोरट्यांना माघार घेतली नाही. त्यामुळे सुरक्षारक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबार झाल्यानंतर चोरटे घाबरून पळून गेले. मात्र यात एकाचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह घटनास्थळी सापडला आहे.
घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून अधिक तपास सुरू केला आहे. सुरक्षारक्षकाची देखील पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world