जाहिरात

Beed Politics : बीडमध्ये मंत्रिपदासाठी 4 दावेदार, कुणाच्या गळ्यात पडणार?

बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी. शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला जेमतेम 25 टक्केच मते मिळवता आली.

Beed Politics : बीडमध्ये मंत्रिपदासाठी 4 दावेदार, कुणाच्या गळ्यात पडणार?

स्वानंद पाटील,बीड

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झालेल्या बीड जिल्ह्यात मंत्रिपदासाठी चारजण दावेदार असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला सहापैकी पाच जागांवर धोबीपछाड दिली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बीडमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला तो धनंजय मुंडे यांनी. शरद पवारांचे चक्रव्यूह भेदत मिळवलेला हा विजय सर्वात मोठा होता. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराला जेमतेम 25 टक्केच मते मिळवता आली. त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. 

आपल्या रांगड्या स्वभावामुळे ओळखले जाणारे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे सुरेश धस यांनी तर चौरंगी लढतीत थोडी थोडकी नव्हे तर 78 हजारांपर्यंत मताधिक्य मिळवले. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून धस यांची ओळख आहे. यामुळेच ते मंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

(नक्की वाचा- VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)

बीड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तब्बल पाचव्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणारे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील मंत्रिपदाचे जेष्ठतेने दावेदार आहेत. उद्धव ठाकरे सरकारमध्ये प्रकाश सोळंके हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याचे दिसून आले होते. त्यांची नाराजी पक्षाला परवडणारी नसेल म्हणून तेही मंत्रिपदाचे दावेदार आहेत. 

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या जरी विधानपरिषदेवर आमदार असल्या तरी देखील विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी महायुतीसाठी सभा घेतलेल्या 27 पैकी 23 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यामुळे  भाजपला त्यांना डावलता येणार नाही. तसेच ओबीसी आक्रमक चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांना भाजपला याचा मोठा फायदा भविष्यात होऊ शकतो. यामुळेच पंकजा मुंडेही मंत्रिपदाच्या दावेदार असतील.

(नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक) )

आता बीड जिल्ह्यात मंत्रीपदासाठी हे प्रमुख चार दावेदार असल्याने मंत्रिपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात महायुतीची देखील मोठी कसोटी लागणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com