जाहिरात

Gadchiroli News: वाळू माफियांना दणका! 15 ट्रॅक्टर्स जप्त, महसूल विभागाची मोठी कारवाई

गडचिरोलीमध्ये रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून तब्बल 15 ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले आहेत. 

Gadchiroli News: वाळू माफियांना दणका! 15 ट्रॅक्टर्स जप्त, महसूल विभागाची मोठी कारवाई

मनिष रक्षमवार, गडचिरोली: राज्याच्या विविध भागांमध्ये वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये वाळू माफियांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडत आहेत. अशातच गडचिरोलीमध्ये रेती वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली असून तब्बल 15 ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गडचिरोलीमधील सिरोंचा येथे अवैध रेती तस्करी करणाऱ्या 15 ट्रॅक्टर्सवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.  मिळालेल्या गुप्त माहित्या आधारावर पहाटेच्या दरम्यान मद्दीकुंटा येथिल गोदावरी नदीपात्रात ट्रक्टरद्वारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करत असल्याबाबतची माहिती महसूल अधिकाऱ्याला मिळाली होती. 

 याच माहितीच्या आधारे  प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद सिरोंचा यांच्या मार्गदर्शनात श्रीनिवास तोटावार नायब तहसीलदार यांच्या नेतृत्वात मौजा मद्दीकुंटा येथिल नदी पात्रात धाड टाकली. यावेळी 15 ट्रॅक्टर नदी पात्रात अवैध रित्या रेती वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. नदीपात्रात  असलेल्या सर्व ट्रक्टर जप्त करून तहसील कार्यालय सिरोंचा येथे जमा करण्यात आले. याप्रकरणी पुढिल कार्यवाही सुरू असून या कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणार्‍याचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

 नक्की वाचा : India Pakistan Ceasefire भारत-पाकिस्तानमधील संघर्ष थांबला, पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताची घोषणा, पाहा Video )

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com