देशात गॅस टंचाईच्या झळ्या; महाराष्ट्रातील या 2 संस्थांनी सर्वांना टाकलं मागे, आजही 40,000 जणांचा होतो स्वयंपाक

पुण्यातील एक देवस्थान आणि छत्रपती संभाजीनगर येथील एक संस्था या गॅस टंचाईतही वेगळी ठरली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune and Chhatrapati Sambhajinagar News : सध्या देशात गॅसच्या टंचाईचा फटका अनेक व्यवसायांना बसताना दिसत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून घरगुती गॅस मिळण्यासही विलंब होत आहे. या परिस्थितीचा परिणाम सर्वसामान्य जनजीवनावरही होताना दिसत आहे. मात्र अशा संकटाच्या काळात पारंपारिक व पर्यायी ऊर्जास्रोतांकडे पाहण्याची गरज पुन्हा अधोरेखित होत आहे.

पुण्यातील एक देवस्थान आणि छत्रपती संभाजीनगर येथील एक संस्था या गॅस टंचाईतही वेगळी ठरली आहे. सध्या जगभरात गॅस टंचाईमुळे नागरिकांसमोर मोठं टेन्शन उभं राहिलं आहे. मात्र पारंपरिक ऊर्जास्त्रोताचा अवलंब करणाऱ्या या दोन्ही संस्था उजव्या ठरल्या आहेत. 

Advertisement

पुण्यातील ओझर अष्टविनायक येथील आदर्शवत ठरणारा प्रकल्प

गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यवसाय, लघुउद्योग तसेच मोठ्या प्रमाणावर अन्न तयार करणाऱ्या संस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असताना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझर येथे उभारलेला बायोगॅस प्रकल्प हा अनेकांसाठी आदर्श ठरत आहे. अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझरमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात अन्नप्रसादाची व्यवस्था केली जाते. या अन्नप्रसादासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची गरज भासत असते. मात्र येथे उभारण्यात आलेल्या बायोगॅस प्रकल्पामुळे सध्या सुरू असलेल्या गॅस टंचाईचा कोणताही परिणाम या ठिकाणी जाणवत नाही.

नक्की वाचा - Pune News : पुणेकरांचं निम्मं टेन्शन संपलं; मोठी कोंडी फुटणार, 8 भुयारी मार्गाचा कुणाला होणार फायदा?

या प्रकल्पासाठी उरलेले अन्न, सेंद्रिय कचरा तसेच इतर जैविक घटकांचा वापर करून गॅस निर्मिती केली जाते. तयार होणारा गॅस अन्नप्रसाद तयार करण्यासाठी तसेच इतर स्वयंपाकाच्या कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

ओझरमध्ये दरवर्षी अनेक सामुदायिक विवाह सोहळे देखील पार पडतात. या कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या स्वयंपाक व्यवस्थेलाही या बायोगॅस प्रकल्पाचा मोठा फायदा होत आहे. उरलेले अन्न व सेंद्रिय कचऱ्याचा योग्य वापर करून गॅस निर्मिती करण्याची ही अभिनव संकल्पना असल्याने पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागतो. सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागात उभारले गेले तर इंधनाचा पर्यायी स्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल. 

संभाजीनगरात स्वयंपाकाचं नो टेन्शन

छत्रपती संभाजीनगर येथील इस्कॉनच्या अन्नामृत फाऊंडेशनने वाफेवर चालणारी यंत्रणा आणि सौरऊर्जेचा वापर करून गॅससाठी पर्याय उभा केला आहे. या प्रकल्पामुळे गॅसशिवाय दररोज ३५ ते ४० हजार विद्यार्थी आणि कर्करुग्णांसाठी कमी वेळा अन्न शिजवलं जातंय. विशेष म्हणजे या फाऊंडेशनअंतर्गत शहरी भागातील १६८ शाळा आणि त्यातील ३७ हजार विद्यार्थ्यांना, ८० बालवाड्यांमधील ३,५०० बालकांपर्यंत आहार पोहोचवला जातो. कर्करोगांनाही येथून अन्न पुरवलं जातं.  

Advertisement