
पुणे: राज्यामध्ये सध्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणेसह दीर सुशील हगवणे आणि सासू, नणंदेला पोलिसांनी अटक केली आहे. पैशासाठी घरातील सुनांचा छळ करणाऱ्या हगवणे कुटुंबाचे अनेक प्रतापही सध्या समोर येत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलचा डान्स ठेवला होता. या डान्सचे व्हिडिओ आता पुन्हा व्हायरल होत आहेत. ज्यावरुन गौतमी पाटीलने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
(नक्की वाचा- Dhananjay Munde : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे सध्या काय करतात? नवी माहिती समोर)
काय म्हणाली गौतमी पाटील?
" जे झालं ते खूप दुर्दैवी आहे, मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी एकच म्हणेन ज्याने हे केलं आहे, त्याला कडक शिक्षा व्हायला हवी मी वैष्णवी यांच्या कुटुंबासोबत आहे. ज्यांनी हे कृत्य केले, जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करते,' असे गौतमी पाटील म्हणाली.
तसेच 'मी आता पाहील तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. मला या गोष्टीचे काहीच माहिती नाही, हे कार्यक्रम मॅनेजमेंट टीम बघत असते. आम्ही कलाकार प्रत्येक गावी कार्यक्रम करतो. पुढे जाऊन काय होईल याची कल्पना नसते. आम्ही कलाकार फक्त कला सादर करतो. मला त्या कार्यक्रमाचे सर्व मानधन मिळाले आहे, आता तो व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे, मी एवढच सांगेल की कृपया कोणत्याही कलाकाराला या गोष्टीत घेऊ नका..', अशी विनंतीही गौतमीने यावेळी केली.
Dharashiv News: खेळताना चिमुकला हौदात पडला, लेकासाठी आईची मंदिराकडे धाव, पण... मन सुन्न करणारी घटना
दरम्यान वैष्णवी कस्पटे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबातील पितापुत्रांना बैलांच्या शर्यतीचा नाद होता. या नादातून महाराष्ट्राती महत्वाच्या शैर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी हागवणे पितापुत्र हे कायमच बैलगाड्यांच्या अड्यांवर फिरत असत. वर्षभरापूर्वी त्यांनी बैलाच्या वाढदिवसासाठी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाची राज्यभरात जोरदार चर्चा रंगली होती.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video ))
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world