जसजसा उन्हाचा कडाका वाढतोय तसतसा पाण्याचा प्रश्न भीषण होऊ लागला आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. तर काहींना टँकरची वाट पाहात बसण्याशिवाय पर्याय नाही. धाराशीव जिल्ह्यातील काजळा हे त्यापैकीच एक गाव. यागावात पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीच धूम सुरू आहे. गावावात नेते प्रचारासाठी जात आहेत. मत मागत आहे. हे पाहाता काजळा गावच्या गावकऱ्यांनी आधी पाणी द्या मग मत मागा अशीच भूमिका घेतली आहे.
आधी पाणी द्या मग मत मागा
काजळा गाव हे धाराशीव जिल्ह्यातील एक गाव. गावाची लोकसंख्या जवळपास 7 हजाराच्या घरात. पण यागावाला पाणीच मिळत नाही. 15 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं. तेही 10 ते 15 मिनिटं. ते पाणी कोणालाही पुरत नाही. काही घरांमध्ये 10 ते 15 माणसं आहेत. त्यामुळे विकत पाणी घेण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही. सध्या लोकसभा निवडणूक सुरू आहे. यापार्श्वभूमिवर जो उमेदवार मत मागण्यासाठी गावात येईल, त्यांना आधी पाणी द्या मग मत मागा अशीच मागणी गावकरी करणार आहेत. घराघरात मत मागता तसं घराघरात पाणी द्या अशी काजळा गावातल्या गावकऱ्यांची मागणी आहे. जो पर्यंत पाणी नाही तोपर्यंत मतही नाही अशीच गावकऱ्यांनी भूमिका घेतली आहे.
हेही वाचा - पाणीबाणी! 15 दिवसातून एकदा पाणी अन् 2 किलोमिटरची पायपीट
टँकर मंजूर पण पाणीच नाही
काजळा गावासाठी दोन पाण्याचे टँकर मंजूर झाल्याचे गावकरी सांगतात. पण हे टँकर कागदोपत्री मंजूर झाले आहेत. त्यातून प्रत्यक्षात पाणी अजूनही मिळालेले नाही. त्यामुळे टँकरच्या पाण्याचीही अजून प्रतिक्षाच आहे. अशा वेळी गावकऱ्यांना नेत्यांकडून मोठी अपेक्षा आहे. निवडणुका असल्यानं आपला पाणी प्रश्न मार्गी लागेल असं त्यांना वाटत आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्याचंही नुकसान होत असल्याचं गावकरी सांगत आहेत. पाणी आलं की शाळा सोडून मुलं पाणी भरण्यासाठी येत असल्याचं ही ते सांगतात. याची तरी दखल घ्यावी असं गावकरी सांगत आहे.
हेही वाचा - छत्तीसगडमध्ये खोल दरीत बस कोसळून भीषण दुर्घटना, 12 जणांचा मृत्यू
नेते पाणी देणार की मत मागणार?
घरोघरी पाणी द्या मग मत माग ही काजळा गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे आता मत मागण्यासाठी येणाऱ्या नेत्यांच्या कोर्टात चेंडू आहे. त्यामुळे ते मत मागणार की आधी पाणी देणार हे महत्वाचं आहे. का नेहमी प्रमाणे आश्वासनाची बोळवण करणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पाण्याची ही समस्या पाहात प्रशासनानंही लक्ष देणं गरजेचं आहे. अजून मे महिना सुरू व्हायचा आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात ही पाण्याची स्थिती आणखी गंभीर होईल. त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या तर गावकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल.
हेही वाचा - खडसेंच्या अडचणी वाढणार? थेट राष्ट्रपतींनाच पत्र, प्रकरण काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world