जाहिरात

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर, विशेष गाड्या सुटणार

Kokan Railway : कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या कोकणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर, विशेष गाड्या सुटणार

कोकण रेल्वेने एकूण सात विशेष गाड्या कोकणासाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण 21 जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण रविवार 21 जुलैपासून सकाळी 8 पासून सुरू होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

1) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (36 फेऱ्या) - 01151
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री 00:20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14:20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. 01152 स्पेशल सावंतवाडीवरून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04:35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबा: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

2) मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण 36 फेऱ्या) 01153
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.10 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. 01154 स्पेशल रत्नागिरीवरून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबा: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड.

रचना: 12 स्लीपर क्लास, 4 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे मिळून एकूण 20 डबे

3) एलटीटी - कुडाळ डेली स्पेशल (36 फेऱ्या -01167)
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री 21.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01168 स्पेशल कुडाळवरून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) दररोज दुपारी 12 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबा: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: 12 स्लीपर क्लास, 4 जनरल, 2 श्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे मिळून एकूण 20 डबे  4) एलटीटी - सावंतवाडी डेली स्पेशल (36 फेऱ्या) -

4)01171 स्पेशल एलटीटी मुंबई येथून
1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी 8.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.00 वाजता सावंतवाडी येथे 01172 स्पेशल सावंतवाडीवरून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.40 वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.

थांबा: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: 12 स्लीपर क्लास, 04 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे मिळून एकूण 20 डबे

नक्की वाचा - Rain Update : शुक्रवारची सकाळ काळ्या ढगांनी, मुंबईत मुसळधार तर कोकणाला रेड अलर्ट

5) दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण 36 फेऱ्या) 01155 मेमू स्पेशल दिवा येथून
1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज सकाळी 7.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.00 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. 01156 मेमू स्पेशल चिपळूणवरून 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) पर्यंत दररोज दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 22.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.

थांबा: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गारगाव, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी.

6) एलटीटी - कुडाळ स्पेशल (16 सेवा) - 01185 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
2 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (8 फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01186 स्पेशल कुडाळवरून 2 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (18 फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 4.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: 12 स्लीपर क्लास, 04 जनरल, 2cश्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे मिळून एकूण २० डबे

7) एलटीटी कुडाळ स्पेशल (6 सेवा) -01165 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून
3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल.01166 स्पेशल कुडाळवरून 3 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 4.50० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबा : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.

रचना: 12 स्लीपर क्लास, 4 जनरल, 2 श्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे मिळून एकूण 20 डब्बे

Switch To Dark/Light Mode
Previous Article
अंबरनाथमध्ये 6 वर्षीय चिमुरडीचा विनयभंग, 23 वर्षाच्या नराधमाला चोपचोप चोपले
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर, विशेष गाड्या सुटणार
Minister Shambhuraje Desai orders Satara police to Take strict action against teasing
Next Article
टवाळखोरी कराल तर थेट धिंड निघणार, 'या'नेत्याने दिले थेट आदेश